गर्दीत मोबाईल चोरणाऱ्या बिहार-झारखंडच्या चोरट्यांना बेड्या

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे लक्ष विचलित करून मोबाइल चोरणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा जवाहरनगर पोलिसांनी यशस्वीरित्या पर्दाफाश केला आहे. या टोळीतील बिहार आणि झारखंड येथील दोन सराईत चोरांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून महागडे तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. रविवारी (दि. २३) सकाळी ७.४५ वाजता सिग्मा हॉस्पिटलच्या बाजूला भाजीपाला खरेदी करताना झालेल्या गर्दीत पोलिसांनी ही कारवाई केली.
शेख फय्याज शेख असलम (२१, रा. साहेबजंग, झारखंड) आणि नकसूद आलम इदवाह आलम (२०,
पहिल्यांदाच आले रेकॉर्डवर !
मोबाइल चोर शेख फय्याज आणि नकसूद आलम हे दोघे पहिल्यांदाच रेकॉर्डवर आले आहेत. ते अनुक्रमे झारखंड आणि बिहारचे आहेत. तेथून मोबाइल चोरण्यासाठी इकडे आले की ते एखाद्या टोळीचा भाग आहेत, त्यांचे साथीदार कोण, याचा पोलीस तपास करीत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिली.
रा. बिहार), अशी चोस्यांची नावे आहेत. राजेश रामराव सानप (४६, रा. जयभवानीनगर) हे फिर्यादी असून शहानूरमियाँ दर्गा चौक भागात सिग्मा हॉस्पिटल परिसरात ते रविवारी सकाळी भाजीपाला खरेदीसाठी गेले. तिथे या दोन्ही आरोपींनी गर्दीचा फायदा घेत सानप यांना धक्का देऊन त्यांच्या खिशातील महागडा मोबाइल लंपास केला. हा प्रकार सानप यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जवाहरनगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे सापळा रचला. पोलिसांच्या पथकाने शेख फय्याज आणि नकसूद आलम या दोघांना पकडले. त्यांच्या झडतीत तीन मोबाइल मिळून आले. त्यात एक मोबाइल सानप यांचा होता.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions