सागर प्रकाशनचे साजवार्ता
Page No.: 3 Date: 05/11/2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दीक्षान्त सोहळा
छत्रपती
संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पदवी तुम्हाला स्पर्धेला सामोरे जाण्याची संधी देते मात्र यशस्वी होण्यासाठी क्षमता ही सिध्द करावी लागत असते. त्यामुळे आगामी काळात राज्य विद्यापीठांनी पदवी केंद्रीत मॉडेलऐवजी क्षमता केंद्रीत मॉडेल विकसीत करावे, असे आवाहन राज्य विद्यापीठांचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६७ वा दीक्षांत समारंभ दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर साधेपणाने नाट्यगृहात सोहळा शिस्तबद्ध रीतीने पार पडला. या समारंभास मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे (आयसीटी) कुलगुरू प्रा. अनिरुध्द पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्य विद्यापीठांचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव
मा. श्री जिष्णु देव
पा. अनिरुद्ध पंडित
३३४ पीएचडी धारक, ६७ हजार ५५९ पदवीधर
यंदाच्या दीक्षांत समारंभात ३३४ पीएचडी स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. ६ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या दहा महिन्यात पीएच.डी. प्राप्त करणा-यांनी ६७ व्या दीक्षांत समारंभात आवेदन दाखल केले. यामध्ये एकुण ३३४ संशोधकांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक १३१ संशोधक हे मानव्यविद्या शाखेचे आहेत. तर विज्ञान व तंत्रज्ञान १२४, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र - ३१ आणि आंतरविद्या शाखेतील ४८ संशोधकांना पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मधील १० हजार ३३१ तर मार्च-एप्रिल २०२६ मधील ५५ हजार २५५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच विद्यापीठ कॅम्पसमधील १६३९ पदवीधारक आहेत. ६७ हजार ५५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
वर्मा यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा झाला. यावेळी कुलगुरु डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, राज्यपाल यांचे सचिव
डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. संजय कवडे, परीक्षा मंडळ संचालक डॉ.बी.एन.डोळे यांची उपस्थिती होती.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













