छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत ७ कोटींच्या विकासकामांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच २० पैकी १७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१३) पार पडलेल्या बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, कर रचना आणि विकासकामांशी संबंधित निर्णय घेण्यात आले. यावेळी काही मुद्यांवरून सदस्यांनी आक्षेप घेतल्याने वातावरण तापले होते. यावर सभापतींच्या हस्तक्षेपानंतर कामकाज सुरळीत झाले. या बैठकीत सात कोटींच्या विकासकामांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
स्थायी समितीची बैठक सोमवारी महानगरपालिकेच्या प्रशासकीय सभागृहात पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला काही वेळासाठी गदारोळ झाला. मात्र त्यानंतर कामकाज सुरळीतपणे सुरू झाले. यात विषय क्रमांक ३ अंतर्गत ४
एमआयएमचा ट्रान्सफर स्टेशनला विरोध
एन- १२ येथे २०१८ पासून ट्रान्सफर स्टेशन कार्यरत आहे. या काळात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील हे आमदार, खासदार होते तेव्हा विरोध का केला नाही, परंतु आता का विरोध केला जात आहे. विरोध करण्यामागे माजी खासदार आणि एमआयएम नगरसेवकांचा काय हेतू आहे, कचऱ्याचा नवीन कंत्राटदार त्यांना भेटला नाही म्हणून विरोध केला आहे, अशा शब्दांत भाजप नगरसेवकांनी सोमवारी तोफ डागली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी दिले. अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात असेल, तर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले.
एप्रिल २०२६ रोजीच्या दुरुस्तीप्रमाणे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा मूळ जमा व खर्चाचा अंदाजपत्रक कायम ठेवण्यात आला. विषय क्रमांक ४ मध्ये झोन क्रमांक १० अंतर्गत गोलवाडी परिसरातील मुळे यांच्या घरासमोरील रस्ता मजबूत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०२२-२३ च्या दरसूचीप्रमाणे ४१ लाख ७९ हजार ४०८
रुपयांचा (१८ टक्के जीएसटीसह) अंदाज मंजूर करण्यात आला. या कामासाठी मे. बालाजी सिव्हिल इंडस्ट्रीज या ठेकेदाराने ४.७५ टक्के कमी दराने ३२ लाख ७४ हजार ४७५ रुपयांची (जीएसटी वगळून) निविदा मिळवली असून, करारास मंजुरी देण्यात आली. विषय क्रमांक ५ अंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी मालमत्ता कराचे दर २०२५-२६ प्रमाणेच कायम
हे प्रस्ताव झाले संमत
या सभेत प्रशासनाने मांडलेल्या १६ प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली. यात झोन १० मधील रस्त्याचे काम, मालमत्ता कराचे जुनेच दर कायम ठेवणे, संजयनगर-मुकुंदवाडी येथील कमान, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती, उद्यानाच्या नूतनीकरणाची कामे, सलीम अली सरोवर येथील एसटीपी प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्ती खर्चास आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
सुविधा द्या, मगच कर वसुली करा
स्थायी समिती सदस्य श्वेता त्रिवेदी यांनी प्रशासनावर टीका करत प्रथम रस्ते, कचरा व्यवस्थापन व इतर मूलभूत सुविधा सुधाराव्यात, त्यानंतरच पारदर्शक पद्धतीने कर वसुली करावी, अशी मागणी केली.
ठेवण्यास मंजुरी देण्यात आली.
यावेळी सदस्य राजगौरव वानखेडे व अॅड. माधुरी अदवंत यांनी कर वसुलीसाठी तयार केलेल्या नियंत्रण कक्ष, अॅप तसेच विविध झोनमधील वसुलीचा तपशील मागितला. यावर सभापती अनिल मकरिये यांनी स्वतंत्र विशेष बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच विषय क्रमांक ६ मध्ये संजयनगर-मुकुंदवाडी येथील रस्ता रुंदीकरणावेळी पाडण्यात आलेल्या कमानीचे ३३ लाख ७५ हजार ८४६ रुपयांत पुनर्बाधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली.
विषय क्रमांक ७ मध्ये कैलासनगर स्मशानभूमी ते बायजीपुरा येथील
गॅस गोदामापर्यंत १८ मीटर रस्त्यासह आरसीसी नाला बांधकामास मंजुरी देण्यात आली. विषय क्रमांक ८ मध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर आक्षेप घेत हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला. तर विषय क्रमांक ९ मध्ये गुंठेवारी अंतर्गत कामासाठी निवृत्त कनिष्ठ अभियंता गंगाधर भांगे यांना सेवेत घेण्यास मान्यता देण्यात आली. बैठकीला सुरेंद्र कुलकर्णी, रामचंद्र नरोटे, अर्चना निलकंठ, रवि कावडे, विनायकराव हिवाळे, सचिन खैरे, राजू राजपूत, श्वेता त्रिवेदी, खान अब्दुल मतीन, अल्मास खानम, अजहर पठाण यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhes Solutions