आचारसंहितेमुळे विकासकामांना बसणार फटका

Foto

जि.प. पदाधिकाऱ्यांची वाहनेही प्रशासनाच्या ताब्यात
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो)
निवडणूक आयोगाने पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबर रोजी जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या असून, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने चालकांसह ताब्यात घेण्यात आली आहेत. याबाबत जि.प.च्या सामान्य प्रशासन
विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी पत्र जारी केले आहे.
आचार
संहितेमुळे
जिल्हा परिषदेच्या नियमित कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विभागीय बैठका, सभा आणि अन्य
विकासकामे रखडणार
आचारसंहिता महिनाभर राहणार असल्याने जिल्हा परिषदेच्या विकासकामांच्या गतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अनेक प्रलंबित कामांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासकीय प्रक्रिया सुरू राहणार असल्या तरी आचारसंहितेच्या कालावधीत नवीन निर्णय घेणे, ठराव मंजूर करणे अथवा राजकीय स्वरूपाच्या बाबींवर पुढील कार्यवाही करण्यास मर्यादा येणार आहेत. त्यामुळे पदाधिकारी आणि प्रशासनाच्या
दैनंदिन समन्वयावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) प्राप्त झालेल्या निधीतून प्रस्तावित असलेल्या विविध विकासकामांनाही आचारसंहितेचा फटका
बसण्याची शक्यता आहे. या कामांसाठी आवश्यक असलेली मंजुरी, प्रशासकीय प्रक्रिया तसेच पुढील कार्यवाहीवर निर्बंध येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
https: sanj Powered By Vrune Solutions Vrudhee