छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): देवगिरी नागरी सहकारी बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२६ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील बँकेच्या कामगिरीचा सविस्तर आढावा सादर केला.
बँकेने ४१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविल्याची माहिती देताना, बँकेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बँकेला प्राप्त झालेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा आणि सुरू करण्यात आलेली इंटरनेट बँकिंग सेवा हे बँकेच्या प्रगतीतील महत्त्वाचे टप्पे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महापौर समीर राजूरकर,
देवगिरी नागरी सहकारी बैंक लिं, छत्रपती संभाजीनगर (न्यू ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
स्थायी समितीचे सभापती अनिल मकरीये तसेच सभागृह नेते गोविंद केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रा.स्व संघाचे देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिल भालेराव, प्रांत कार्यवाह धनंजय धामणे, प्रांत सहकार्यवाह डॉ. रमेश जाधव, सभासद शरद भोगले, माजी संचालक हिम्मतराव गवळी, रघुवीर ओक आीद मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सभासदांनी विविध विषयांवर सूचना व प्रश्न उपस्थित केले. त्यास बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, ज्येष्ठ संचालक शिवाजीराव शेरकर, अशोक पाटील, प्रशांत देशपांडे आणि अॅड. मुकेश गोयनका
यांनी उत्तरे दिली. या सभेस बँकेचे उपाध्यक्ष उमेश दाशरथी, संचालक राजेश जैन, सजनराव मते, जयश्री किवळेकर, प्रशांत देशपांडे, नागनाथ काजळे, अॅड. सागर विद्वन्स, प्रा. डॉ. क्षमादेवी खोब्रागडे, डॉ. प्रज्ञा तल्हार, सुरेश जगाडे, सरदारसिंग बैनाडे आदींची उपस्थिती होती. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता शिंदे यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यवृत्ताताचे वाचन केले. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपेंद्र कोयाळकर यांनी आभार मानले.












