पाथर्डी- काही जण वारसा सांगतात मुंडे साहेबांचा आणि नाव लावतात दुसरऱ्यांच. अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली होती. त्याला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी घरच्यांनी खलनायक ठरविले पण पवार साहेबांनी माझी कुवत ओळखली. अश्या शब्दात उत्तर दिले आहे.
गोपीनाथ मुंडे साहेबांनी माझ्याशी रक्ताचे नाते तोडल्याचे भगवानगडावरून जाहीर केले. नंतर मला पुढे करत खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला. पण पवार साहेबांनी माझी कुवत ओळखली आणि मला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले, असं धनंजय मुंडे म्हणाले. चिचोंडी ता. पाथर्डी येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते.