पैठण, (प्रतिनिधी) : पैठण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची निवडणूक पार पडली असून आता सर्वांचे डोळे स्वीकृत सदस्या च्या निवडणूकी कडे लागले आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीत स्वतःला प्रतिष्ठित समजणारे व धनदांडगे हे खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या मागेपुढे स्वतःच्या फायद्यासाठी फिरत होते. तर निष्ठावंत कार्यकर्ते नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करताना दिसत होते.
नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची निवडणूक संपन्न झाली असून आता स्वीकृत सदस्य निवडीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. स्वीकृत सदस्य पदाची उमेदवारी मिळावी यासाठी निवडणुकीत पडद्याआड राहून आपापल्या नातेवाईकांचे प्रचार करणारे हेच धन दांडगे पूर्णतः तयारीला लागले आहेत. त्यांनी आपापल्या परीने वशिला लावण्यास सुरुवात केला आहे. स्वीकृत सदस्य साठी सर्वात जास्त धन दांडगे पुढे आलेले दिसत आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकटअसल्या मुळे ते निवडणूक लढू शकत नाही तसेच तिकीट न मिळाल्याने बंडखोरी न करता पक्षाचे आदेश पळून आदेश पाळून पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ते अहोरात्र झटत होते.
अशा गरीब व निष्ठावान कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य पदाची उमेदवारी देण्यात यावी. जेणेकरून गरीब व निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली परंतु ते पराभूत झाले आहेत. त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात येऊ नये कारण नगरसेवक
असताना त्यांनी कार्यकर्त्यांना दूर केले होते. दहा वर्षात त्यांनी कार्यकर्ते जोडले नाही पक्ष मजबूत करण्यासाठी लक्ष दिले नाही. स्वतःचे हित पाहिले आहे अशांना पुन्हा संधी देण्यात येऊ नये अशी मागणी कार्यकर्त्याकडून केली जात आहे.
उपनगराध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य पदासाठी हालचाल सुरू झाली असून शिवसेनेकडून तुषार पाटील, संगीता मापारी हे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. तसे न झाल्यास शिवसेना राष्ट्रवादी युतीचे बजरंग लिंबोरे व सौ. अलका परदेशी हे सुद्धा दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांचाही उपनगराध्यक्ष पदासाठी विचार होऊ शकतो.















