नवी दिल्ली : यूजीसी नेटच्या तीन विषयाची जून २०२६ रोजी झालेली परीक्षा एनटीएने रद्द केली. यूजीसी नेट इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाची परीक्षा घेण्यात आली होती. पण, एनटीएने परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याचे जाहीर केले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.
दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही पहिली पायरी होती, शेवटची नाही. एनटीएच्या नेतृत्वालाही जबाबदार धरलेच पाहिजे. सप्टेंबरमध्ये पुन्हा ही परीक्षा देणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगायचे आहे की, तुम्ही समस्या नाही आहात. पंतप्रधानांनी अशी व्यवस्था निर्माण केली आहे की, जी एक परीक्षाही व्यवस्थित घेऊ शकत नाही आणि नंतर परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांनाच दोष देते. तुमची वर्षे हिरावून घेतली जात आहेत आणि जोपर्यंत पंतप्रधान यावर उत्तर देत नाहीत, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असा इशारा राहुल गांधींनी दिला.
एनटीएकडून याची माहिती जाहीर करण्यात आल्यानंतर राहुल गांधींनी संताप व्यक्त केला. तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका सदोष असल्याच्या अनेक तक्रारी आल्या असून, समिती स्थापन करण्यात आली होती. आणि समितीच्या शिफारशींनुसार नव्याने ही परीक्षा घेण्यात येत असल्याचे एनटीने सांगितले.
राहुल गांधी म्हणाले, दोन महिन्यानंतर परीक्षा रद्द केली
एक्सवर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले की, समाजशास्त्र, इंग्रजी आणि वाणिज्य या विषयांच्या यूजीसी नेट परीक्षा २२ ते ३० जून दरम्यान घेण्यात आल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांनंतर एनटीएने या तिन्ही परीक्षा रद्द केल्या आहेत; कारण त्यांनी सदोष प्रश्नपत्रिका तयार केल्या ज्यात जुने प्रश्न पुन्हा विचारले होते. वर्षानुवर्षे तयारी करणारे, अर्ज भरणारे, परीक्षा शुल्क भरणारे आणि लांबच्या केंद्रांपर्यंत प्रवास करणार्या हजारो उमेदवारांना आता सप्टेंबरमध्ये हे सर्व पुन्हा करावे लागणार आहे. चूक एनटीए करते, पण शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना भोगावी लागते, अशी टीका राहुल गांधींनी केली.
ही व्यवस्था साधी नोकरी सुद्धा देत नाही
मी याबद्दल कोटा, डेहराडून, प्रयागराजमध्येही बोललो होतो आणि मी पुन्हा सांगत राहीन, ही आता शिक्षण व्यवस्था राहिलेली नाही. हे एक पिळवणूक करणारे यंत्रणा बनलेली आहे. ते तुमचे पैसे, तुमची वर्षे, तुमचे मानसिक आरोग्य आणि तुमचा आत्मविश्वास हिरावून घेते आहे आणि बदल्यात काहीही देत नाहीये. साधी नोकरीसुद्धा देत नाहीयेङ्घङ्घ, असा संताप राहुल गांधींनी व्यक्त केला.
राहुल गांधी म्हणाले, खर्या प्रश्नाचे एनटीए उत्तरच देत नाही
विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पुढे म्हटले आहे की, एनटीए अजूनही खर्या प्रश्नाचे उत्तर देत नाही की, परीक्षेपूर्वी या प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या का? मोदी सरकारच्या इतर प्रत्येक विभागाप्रमाणेच, एनटीएदेखील ही आपली चूक आहे असे कधीच मान्य करत नाहीये. इतर प्रत्येक गैरप्रकार झालेल्या परीक्षांप्रमाणेच, मला पूर्ण खात्री आहे की येथेही कोणालाही जबाबदार धरले जाणार नाही, अशा शब्दात राहुल गांधींनी निशाणा साधला.