वैजापूर, (प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र गोदाधाम ४ सराला बेटावरून, योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज व ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या दोनशे वर्षांच्या परंपरेतील आषाढी वारी दिंडीचे ९ जुलै रोजी प्रस्थान होणार असल्याची माहिती बेट संस्थानने दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात शिस्तप्रिय दिंडी म्हणून ख्याती असलेल्या या वारीत सहभागी होणाऱ्या पुरुषांसाठी पांढरा पोशाख, तर महिलांसाठी एकाच रंगाची साडी परिधान करण्याचे नियम बंधनकारक आहेत. महंत रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली २ ते अडीच हजार वारकरी दररोज २२ ते २५ किलोमीटर पायी प्रवास करत १७ दिवसांत, म्हणजेच २२ जुलै रोजी पंढरपूर येथील मठात दाखल होतील.
२५ जुलै रोजी एकादशीनिमित्त दर्शन आणि २६ जुलैला महंत रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने दिंडीची सांगता होईल. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा परिषद छत्रपती वतीने संभाजीनगरच्या भाविकांसाठी आरोग्य पथक व पाण्याचे टँकर पुरवले जातील, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी दिली. या पालखी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आयोजकांनी केले आहे. आवाहन












