शासकीय जमिनी बळकावणाऱ्या भूमाफियांवर आता थेट फौजदारी गुन्हे

Foto
विभागीय आयुक्तांचा इशारा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शासकीय जमिनींचे बनावट दस्तावेज तयार करून त्या हडप करण्याचा धक्कादायक प्रकार प्रशासकीय तपासणीत उघडकीस आला आहे. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे जमिनी बळकावून त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या भू-माफियांवर आता थेट फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि. १४) पत्रकार परिषदेत दिला.
राज्य शासनाकडून सरकारी जमिनी, विविध प्रकारच्या इनामी जमिनी, वर्ग २ च्या जमिनींची माहिती गोळा करण्यात येत आहे. यामध्ये अनेक ठिकाणच्या शासकीय जमिनी खासगी लोकांनी
बळकाविल्याचे समोर आले आहे. या जमिनीबाबत इतंभूत माहिती काढल्यानंतर काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आणि खोटे कागदपत्र तयार करीत सरकारी, वर्ग २ ज्या जमिनी खासगी लोकांच्या नावे केल्याचे
धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यामध्ये चिकलठाणा भागातील गट क्रमांक ७७३ मधील पाऊन एकर जमीन तर दिल्ली गेट भागातील गट क्रमांक ३४ मधील ५ हेक्टर जमिनीचा समावेश आहे.
ही जमीन खिदमतमास असतानाही त्यावर काही जणांनी घरे बांधली आहेत तर एक पेट्रोल पंपही उभारण्यात आला आहे. काही जणांनी मालमत्ता पत्रकाही तयार करून घेतल्याचे समोर आले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions