औरंगाबादेत येणार्‍या प्रवाशांची तपासणी करण्याचे निर्देश

Foto
औरंगाबाद : कोरोना व्हायरसने  देशभरातच  नव्हे  तर  जगभरात  दहशतीचे  थैमान  घातले  असतांना  याकडे  एसटी  मंडळाच्या  अधिकार्‍यांनी  याकडे  साफ  दुर्लक्ष  केल्याचे दिसून आलेे. राज्य  शासनाने  सर्व  सार्वजनिक  ठिकाणी  कोरोनाशी  मुकाबला करण्यासाठी  सतर्क  राहण्याचे  आदेश  दिले आहे.  विमानतळ, रेल्वे  स्टेशन  ते  बसस्टॅन्ड  येथे  येणार्‍या   जाणार्‍या  प्रवाश्याची  चाचणी  करण्याचे  फर्मान  जारी करतांना  आरोग्य  पथक  नेमण्याचे  सांगितले आहे  मात्र, एसटीच्या  अधिकार्‍यांनी  सेंट्रल व  सिडको बस  स्टॅन्ड वर कोणतेच  उपाययोजना  केलेल्या  नाहीत.
औरंगाबाद शहर ऐतिहासिक पर्यटन स्थळ असल्याने दररोज हजारो प्रवासी बस,रेल्वे ने ये- जा करतात. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महापौर नंदू घोडेले यांनी पालिका  आरोग्य  विभागा  तर्फे  दोन्ही  बस्थानकावर  पथक  नेमूण येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांची तपासणी करा,असे आदेश
दिले आहे.  मात्र, स्थानकावर अजूनही  पथक नेमण्यात आलेले  नाही. महाराष्ट्रात  संशयित  रुग्णांची  वाढती  संख्या  पाहता शासनाने  कालच राज्यातील  शहरी  भागातील  सर्व  शाळा, महाविद्यालयांना 31 मार्च  पर्यंत  सुट्टी  जाहीर  केली. केंद्र  राज्य  सरकारच्या  आरोग्य  विभागांना  अलर्ट  वर  ठेवण्यात आले आहे, असे  असताना औरंगाबाद  एसटीचे अधिकारी गाफील  कसे? हा प्रश्न आहे. दोन्ही  बस स्थानकाचा फेरफटका  मारला असता  येणारे  जाणारे  प्रवासी  बिनधास्त  पणे ये - जा करत  असल्याचे  दिसून  आले. या  ठिकाणी  न  आरोग्य पथक दिसून आले नाही.
याबाबत एसटी  कंट्रोलर  कडे  विचारपूस  केली  असता  आम्हाला काहीच  माहीत  नाही , वरिष्ठांना  विचारा  असे सांगण्यात आले. एकूणच  दोन्ही  स्थानकावर  प्रवाश्यांचे  आरोग्य  रामभरोसे  असल्याचे  दिसून  आले. तसेच शासनाकडून  कोरोना  वायरसचा  प्रादुर्भाव  होऊ  नये,  म्हणून  युद्ध  पातळीवर  उपाययोजना  केल्या  जात  आहे. शासन  दरबारी  दररोज  बैठक  घेऊन  राज्यातील  परिस्थितीचा आढावा  घेतला  जात  आहे.मुंबई  येथील  सेंट्रल  कार्यालयातर्फे  बसस्थानक  व  बसेसची  सफाई  करण्याचे  आदेश काढण्यात  आले. मात्र, दीड महिन्यापासून खाजगी कंपनीने बसस्थानकांत सफाई चे  काम बंद केले आहे.

विमानतळ, रेल्वेस्थानकावर व्यवस्थाच नाही
 आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण उडाने औरंगाबादेतून होत नाहीत, त्यामुळे कोरोना व्हायरस आपल्याकडे येण्याची शक्यता नाही. असा दावा करीत जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा सुस्त राहिल्याने औरंगाबाद शहरावर कोरोनाचे सावट गढद झाल्याची टीका आता होत आहे. अगदी गेल्या आठवड्यातच जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी पत्रकार परिषद घेत यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला होता. मात्र गेल्या दोन तीन आठवड्यापासून कोरोनाचे संकट शहरावर घोंगावत होते. तेव्हा ही यंत्रणा गायब होती हे ही तेवढेच खरे. गेल्या महिनाभरापासून कोरोनाचे सावट महाराष्ट्रावर घोंगावत होते. शहरात ही कोरोनाची दहशत तब्बल महिनाभरापासून होती. अशा गंभीर परिस्थितीत विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक यासह शहरात येणार्‍या सर्वच मार्गांवर कोरोना प्रतिबंधक यंत्रणा उभारण्याची गरज होती. विशेषतः विमानतळावर अतिशय सतर्क राहण्याची आवश्यकता होती. मात्र विमानतळ प्राधिकरणाने मुळीच काळजी घेतली नाही. तेथील कर्मचारीही बेफिकीर होते, त्यांनीही कधी मास्क वापरला नाही. याबाबत सोशल मीडियावर मोठी टीका झाली. औरंगाबादेत विमानतळावर खबरदारी घेता येत नसल्याची बाब अनेक प्रवाशांनी प्रसार माध्यमावर प्रसारित केली होती. तेव्हाही विमानतळ प्रशासन भानावर आले नाही. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच कोरोनाचा धोका वाढला होता. तरीही दोन आठवडे विमानतळ प्रशासन, रेल्वेस्थानक प्रशासन झोपेत राहिले ही गंभीर बाब आहे.

डेपो मॅनेजर सुनील शिंदे यांना विचारले असता, खाजगी  सफाई कामगारांकडून सफाई केली जात आहे. आदेशाचे पत्र आल्या नंतर आम्ही  सफाई सामानाची मागणी केली आहे. सामान न मिळाल्यास बाजारातून समान खरेदी करून आजपूसन एसटी बस्थानक  व बसेसची सफाई सुरु करण्यात येईल. महानगरपालिका किंवा घाटी प्रशासन तर्फे  कोरोना संदर्भात कोणतेच  सहकार्य  करण्यात आलेले नाही. दोन्ही बसस्थानकावर आरोग्य पथक नसल्याने  प्रवाश्यांची चाचणी वगैरे होत नाही. वरिष्ठांच्या आदेशावर पुढील कामकाज  करू असे त्यांनी सांगितले.