शिवसेना शिंदे गटात नाराजी नाट्य खा. श्रीकांत शिंदेंच्या समोरच पदाधिकाऱ्यांची खदखद नेत्यांच्या इगोमुळे जि.प.ची सत्ता गेल्याचा आरोप

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): स्थानिक नेत्यांच्या इगोमुळे जिल्ह्यात बालेकिल्ला ढासळला आहे. महानगरपालिका निवडणुकीत याचा फटका बसला. जिल्हा परिषद निवडणुकीत चांगल्या जागा येऊनही सत्ता मिळाली नाही. आता जिल्हा बँकही जाईल, अशी खदखद शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.१२) खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर व्यक्त केली. पक्ष-संघटना मजबूत करण्यातील अडचणी त्यांना कळाल्या असून, त्यावर आता वरिष्ठांकडून उपाय केले जातील, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बैठका घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यासाठी संपर्कप्रमुखांची
खोटे बोल; पण रेटून बोल : पालकमंत्री
▶ पक्षसंघटनेचे काम करताना पालकमंत्र्यांकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डावलले जाते. निधी दिला जात नाही, निर्णय घेताना विचारले जात नाही, अशी तक्रार पदाधिकाऱ्यांसह जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी बैठकीत केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर खोटे बोल; पण रेटून बोल, असा प्रकार सुरू असून, दोन माणसे पाठवून सर्व तक्रारींची चौकशी करावी, अशी मागणी पालकमंत्र्यांनी खा. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुरुवातीला झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यानंतर झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनीही गाऱ्हाणे मांडले.
पुन्हा दिसला बेबनाव
नियुक्ती केली असून, मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येत आहेत.
जाणून घेतल्या अडचणी
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. पदाधिकारी, कार्यकर्ते कसे काम करतात, त्यांच्या अडचणी काय आहेत, हे जाणून घेणार असल्याचे असे खासदार शिंदे यांनी
पक्ष संघटना बळकटीकरणाच्या बैठकीतच पालकमंत्री संजय शिरसाट आणि आ. अब्दुल सत्तार यांच्यातील बेबनाव पुन्हा एकदा उघड झाला. पालकमंत्री शिरसाट व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी समोर असलेल्या सर्व नेत्यांना नमस्कार करत विचारपूस केली. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्याशीही संवाद साधताना ते दिसून आले. मात्र, शेजारच्याच खुर्चीवर बसलेल्या आ. अब्दुल सत्तार यांच्याकडे दुर्लक्ष केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions