विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी हस्ते स्पर्धांच्या प्रमाणपत्रांचे वितरण

Foto
नशामुक्ती जनजागृती अभियान व बालविवाह मुक्त अभियान

सिल्लोड, (प्रतिनिधी) : नशामुक्ती, बालविवाह बाबत १४ जुलै ते २८ जुलै या जनजागृती दरम्यान शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यात चित्रकला, निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, वादविवाद, पोस्टर, हस्ताक्षर स्पर्धा, गोष्टी सांगणे, रांगोळी, काव्यरचना, हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धेचा निकाल शाळा, केंद्र तालुका, जिल्हा याप्रमाणे निवड करत जिल्हास्तरावर यशवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा, शिक्षणधिकारी अश्विनी लाठकरसह अधिकारी, पदाधिकारी उपस्थितीमध्ये प्रोत्साहनपर प्रमाणपत्र वाटप केले. देवयानी शेजुळ, वैभव सरोदे, आरोही गणेश काकडे, या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

 तर शाळा स्तरावर पवन सोनवणे, समर्थ भानुसे, तन्वी बनकर, शिवानी भोजने, देवेश काकडे, कोमल साखरे,
वेदिका गवळी, स्नेहल शिंदे, श्रद्धा खाकरे, आरुषी जाधव, असीम शेख, सूरज काकडे, अथर्व मुळे, हर्षदा गवळी, श्रावणी बिडवे, दिव्या माचवे, पुनम कोलते, वैभव, सोहम शिंदे, समीक्षा कोलते, समर्थ मानकर, गणेश साळवे या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. 

सूर्या लॉन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात हा सन्मान विद्यार्थ्यांना मिळाला. यावेळी दीपाली थावरे, मेहेत्रे, श्रीमाळ, गीता तांदळे, पवार, दिलीप शिरसाठ, जयेश चौरे, धनंजय फड, सुनीता वाघ, गणेश काकडे, नरेश बलकार, रायभान जाधव आदी उपस्थित होते.