लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप

Foto
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्यूरो): माळीवाडा येथे लोकशाहीर डॉ. आण्णा भाऊ साठे यांची जयंती शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी झेडा वंदन ग्रामविकास अधिकारी बालकुष्ण गव्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. आण्णाभाऊ साठे पुतळ्यास प्रशासक सरपंच ज्योती मुळे, उपसरपंच मनेश गाजरे, मान्यवरानी हार घालुन पुजन करण्यात आले. 

यावेळी पहिलीच्या शालेय विद्यार्थ्यांची आण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर मार्गदर्शन केले. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जिवना विषयी विचार माडले. सर्व मुलांना बक्षिसे वाटण्यात आली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या परिसरात विद्युत रोशनाई केली. रागोळी टाकून परिसर सजवला होता. आण्णा भाऊ साठे यांच्या जयघोशाने परिसर दुमदुमला.