साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप

Foto
कन्नड, (प्रतिनिधी)  : शहरातील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थिनींसाठी ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड वितरण तसेच मासिक पाळी स्वच्छता जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 

या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थिनीमध्ये मासिक पाळीबाबत जागरूकता निर्माण करणेतसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवूनदेणे असा होता. सदरील सामाजिक उपक्रम विश्व उद्यम सहाय्यता फाउंडेशन च्या प्रगती तायडे यांच्या पुढाकारातून तसेच धरती सजीवनी फाउंडेशनचे सत्तार खान यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. 

एक लाख सॅनिटरी पॅड वितरण मोहिमेचा भाग म्हणून आजवर विद्यार्थिनींना हजारो ऑर्गेनिक सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले सानेगुरुजी विद्यालय येथील कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक व समन्वय माधुरी नारखेड यानी केले. यावेळी शाळेतील व्यवस्थापन व महिला शिक्षिका हर्षदा कदम, अलका जाधव तसेच शाळेच्या व्यवस्थापन मंडळातील इतर मान्यवर उपस्थित होते.