गणोरी पीएमश्री जि.प. प्रशालेत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

Foto
विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम तंत्रज्ञान हा प्रदर्शनाचा मुख्य विषय शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांची माहिती
फुलंब्री, (प्रतिनिधी): जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ५३ व्या तीन दिवसीय जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पीएमश्री जि.प. प्रशाला गणोरी येथे होत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा. श्रीमती अश्विनी लाठकर यांनी दिली.

राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूरच्या निर्देशानुसार होत असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या हस्ते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांच्या अध्यक्षतेखाली २९ डिसेंबर सोमवारी सकाळी १०:३० वाजता होत आहे. उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी (योजना) श्री अरुण शिंदे हे उपस्थित राहतील.

या प्रदर्शनाचा समारोप जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते, विभागीय शिक्षण उपसंचालक कैलास दातखिळ, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या संचालक शैलजा दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तालुका विज्ञान प्रदर्शनात्त बक्षीसपात्र ठरलेले प्राथमिक विभागातून ३ माध्यमिक विभागातील ३, दिव्यांग विद्यार्थी गट, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचर यांच्या प्रत्येकी १ प्रतिकृती बालवैज्ञानिक व मार्गदर्शक शिक्षक प्रदर्शित करतील. विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) असा मुख्य विषय असलेल्या या प्रदर्शनात सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याची गरज लक्षात घेऊन, शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन आदी उपविषयांवरील कल्पक आणि सृजनशील संकल्पना उपकरणांच्या माध्यमातून मांडल्या जातील.

मागील हे तीन वर्षापासून शहरी भागात आयोजित झालेले हे प्रदर्शन यंदा ग्रामीण भागात होत असल्याने विद्यार्थी आणि विज्ञान अभ्यासक, नागरिकशिक्षक यांना नवा अनुभव देणारे ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांना रात्रीचे आकाशदर्शन, तारांगण,
सायन्स ऑन व्हील आदी रंजक आणि नवी वैज्ञानिक दृष्टी देणाऱ्या बार्बीचाही लाभ घेता येणार आहे. पीएमश्री जि. प. प्रशाला गणोरी येथे होत असलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनाचा गणोरी, फुलंब्री परिसरातील शाळा, विद्यार्थी व नागरिक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे यांच्यासह माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी सीमा मेहेत्रे, दिपाली थावरे, गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर यांनी केले आहे,

विज्ञान पर्यवेक्षक दिलीप सिरसाठ, विस्तार अधिकारी राजेश महाजन, सिताराम पवार, जालम चौरे, आयोजक मुख्याध्यापक अनिल प्र. देशमुख, सरपंच सरला तांदळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास गायकवाड याच्यासह केंद्रप्रमुख पंडित भोसले, समन्व्यक एस. डी. नाईकवाडे, सरपउपसरपंच राजू तांदळे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राधाकृष्ण पेहेरकर, सदस्य नामदेव काळे, सीमा राजू उबाळे, जनाबाई जाधव, राजू जाधव, रूख्मन तांदळे, समीना इम्रान शेख, गणेश जाधव, अशोक सोनवणे, प्रशालेचे शिक्षकवृंद एस. डी. देशमुख, एन. एन. परदेशी, एस. डी. नाईकवाडे, अरविंद राजहंस, एस. एम. बाबरेकर, सुरेश ठाकूर, रामेश्वर जाधव, राजेंद्र जगताप, बी. व्ही. ठाकरे, भगवान राजपूत, कुंदन सूर्यवंशी, सतीश मचिये, के. एन. सिंघल, दिगबंर दापके, कृष्णा जयस्वाल, एस. एन. बारसाकडे, डी. पी. सुरासे, सविता मोडेकर, रुपाली अन्नदाते, सागर भालके, अमोल सपकाळे, प्रज्वल घोडे, बाबासाहेब सोनवणे, आनंद भालेराव यांनी केले आहे.