सिल्लोड, (प्रतिनिधी) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, जिल्हास्तरीय पथकाकडून शुक्रवारी (दि. १३) रोजी ग्रामपंचायत सावखेडा बुद्रुक खुर्द, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामपंचायतची पाहणी करण्यात आली.
यावेळी पथक प्रमुख उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर डॉक्टर ओमप्रकाश रामावत, गटविकास अधिकारी वर्ग १, पंचायत समिती सिल्लोड रत्नाकर पगार, जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा
परिषद छत्रपती संभाजीनगर चे माहिती शिक्षण संवादतज्ज्ञ डॉ. संजय वाघ, विस्तार अधिकारी पंचायत साहेबराव शेळके, जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष छत्रपती संभाजीनगर समाजशास्त्र तज्ज्ञ वैशाली जगताप, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) पंचायत समिती सिल्लोड गट समन्वयक केशवकांत बुलबुले यांनी गावात स्वच्छतेचे उपांगाची पाहणी केली.
यात वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, कापडी पिशव्यांचा वापर, मैला गाळ व्यवस्थापन, मुलांच्या उन्नतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम अभ्यासासाठी भोंगा, वृक्ष लागवड, मुलांसाठी अभ्यासिका, लोक सहभाग श्रमदानातून गाव स्वच्छता, ट्यूब लेवल नळ कनेक्शन, गावातील सर्व नळांना तोट्या, भूमिगत गटार, शाळा अंगणवाडी यांना हॅन्ड वॉश स्टेशन, पिण्याचे पाण्याची उपलब्धता, संस्थात्मक स्तरावर स्वच्छतागृह, स्मशानात भूमी सुशोभीकरण आसन व्यवस्था, शाळेत परस बाग इत्यादी तसेच इतर गावात राबविलेले विविध विकासकामे ची पाहणी या पथकाद्वारे करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सावखेडा बुद्रुक, खुर्द येथील व सरपंच काशिनाथ सदाशिव गोरे, उपसरपंच प्रभाकर भिकन गोंगे, ग्रामपंचायत अधिकारी विलास ढेंगे सर्व ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, सखी, महिला स्वयंसहायता गटाच्या अंगणवाडी सेविका, शिक्षक वृंद, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









