माळीवाड्यात पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Foto
पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी; पंचनाम्याच्या प्रक्रियेला वेग

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो):  कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत बाधित झालेल्या पिकांची जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शनिवारी (दि. ३) माळीवाडा येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. त्यांनी शेतकरी जनार्दन उमराव मुळे यांच्या गट क्रमांक १३७मधील सोयाबीन व तूर पिकांची पाहणी करून नुकसानीची माहिती घेतली.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके, तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच माळीवाडा ग्रामपंचायतीचे प्रशासक ओ. पी. चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत कमी पाऊस, पिकांची सद्यःस्थिती आणि झालेल्या नुकसानीबाबत माहिती जाणून घेतली. दरम्यान, पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून पंचनामे करण्यासाठी गठित त्रिस्तरीय समितीनेही प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची नोंद केली. जिल्हात पंचनामे जोरात चालू आहे शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासन संवेदनशील आहे.

सर्व शेतकरी अश्वशीत करतो सर्व शेतकऱ्यांना लवकरत लवकर शासन मदत करेल. यावेळी महसूल अधिकारी प्रशांत वनकर, सहाय्यक कृषी अधिकारी रंगनाथ पिसाळ, ग्रामपंचायत अधिकारी बाळकृष्ण गव्हाणे, महसूल अधिकारी सुरज गिरी, ई-पिक पाहणी सहाय्यक मिलिंद साठे तसेच पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळावी, यासाठी पीक नुकसानीचे पंचनामे अचूक व वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य लंकाताई जाधव सिचन अधिकारी मिनाक्षी मगर, पोलीस पाटील प्रमोद साठे, शेतकरी मुक्ताराम हेकडे, मारुती फटांगडे, वैजिनाथ हेकडे जनार्दन मुळे, जगन्नाथ भगत, मनीष गाजरे, नारायण गाजरे, आनंद गाजरे, सुरेंद्र जगधने, वैजनाथ हेकडे, भगवान बनसोडे, गणेश आस्वार, नंदकिशोर मुळे, छबू पेहेरकर, यादव शिंगारे पोलिस उपनिरीक्षक डोबाळे यांच्यासह गावातील व परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.