घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासकामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात पर्यटनाला चालना देण्यासाठी होत असलेल्या विकासकामांची जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी पाहणी केली. विकासकामे दर्जेदार व विहीत वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. तसेच मंदिर परिसरातील विकासकामांची सद्यस्थिती जाणून घेतली.
त्यांचे समवेत उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, अंकिता ताकभाते, कार्यकारी अभियंता स्मिता पवार, उप अभियंता दिलीप कोलते, शाखा अभियंता सागर सावजी, सौरभ चव्हाण, रचनाकार प्रदीप देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, वेरुळ ग्रा.पं. प्रशासक दीपक बागुल, ग्राम प्रशासक गंगाधर गायकवाड, मंडळ अधिकारी विजय चव्हाण, लक्ष्मण जाधव, ग्राम महसूल अधिकारी भूषण रोजेकर, पोलीस पाटील रमेश दोरे आदी उपस्थित होते.
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी
भक्तनिवासाची पाहणी
जिल्हाधिकारी गौडा यांनी या पाहणीदरम्यान नव्याने उभारण्यात येत असलेल्या भक्तनिवासाची पाहणी केली. भाविकांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. तसेच मंदिर परिसरातील स्वच्छता, रस्ते व बाजारपेठेचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, नदी परिसराचे व्यवस्थापन आणि मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, दर्शनासाठी वेळ कमी लागावा व प्रतिक्षा कालावधी कमी व्हावा.
मंदिर परिसर स्वच्छ व सुव्यवस्थित राहावा आणि विकासकामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, असे निर्देश गौडा यांनी दिले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions