जि. प. अध्यक्ष अविनाश गलांडेंची शिवसेना भवनला भेट

Foto
आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार

सिल्लोड, (प्रतिनिधी): जिल्हा परिषद नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश पा. गलांडे यांनी आज सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय, शिवसेना भवन येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी अविनाश गलांडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकासकामांना गती देऊन ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अविनाश पा. गलांडे यांनीही सदिच्छा 
साट्र राज्य विद्युत बीज किती मं
आढावा बैठक
भेटीदरम्यान आमदार सत्तार यांचे मार्गदर्शन लाभणे ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पाणी, रस्ते, शिक्षण व आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या भेटीत विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे सभापती विश्वास पा. दाभाडे, जि. प. सदस्य देविदास पालोदकर, ऍड. अब्दुल आमेर अ. सत्तार, सय्यद नासेर हुसेन, मंगला तायडे, निकिता काळे, पंचायत समिती सदस्य सुरेखा शिंदे, निजाम पठाण, शेख सलीम, रघुनाथ मोरे, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, कृउबा समितीचे संचालक दामू अण्णा गव्हाणे, सतीश ताठे, गजानन महाजन यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.