छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियाना' अंतर्गत मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती रुजवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ग्रंथालयांसाठी महानगरपालिकेने वाचनीय पुस्तके दान करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले होते. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी पहिल्याच दिवशी या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वतःला भेट मिळालेली व स्वतः खरेदी केलेली ग्रंथालयीन पुस्तके जवळपास ४० हजार २१० रुपयाची १६२ पुस्तके
मा. विभागीय आयुक्न जी. श्रीकांत साहेव
ग्रंथालयासाठी महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दान केली आहेत. मनपा उपयुक्त अंकुश पांढरे आणि कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांच्याकडे सुपूर्द केली. मनपचा उपक्रम स्तुत्य असून,
समाजातील प्रत्येक घटकाने व स्वयंसेवी संस्थांनी या ज्ञानयज्ञात सहभागी होऊन मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना समृद्ध वाचनाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी भावना विभागीय आयुक्त श्रीकांत यांनी यावेळी व्यक्त केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















