छत्रपती संभाजीनगर, संदर्भात जलवाहिन्या जोडण्याची कामे, जॅकवेलची कामे, पंपिंग, पाणी शुद्धीकरण आणि बटरफ्लाय व्हॉल्वची दुरुस्ती व तपासणी, वितरणव्यवस्थेसह संपूर्ण कामाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेत जलकुंभात पाणी पोहचविण्यासाठी जलवाहिनी लिकेज असल्यास तातडीने दुरुस्ती, उपाय योजना करण्याची सूचना केली.
(सांजवार्ता ब्यूरो): शहराला पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उर्वरित मुख्य कामे योग्यरित्या पूर्ण करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आढावा घेतला. शहरातील घरोघरी पाणी पोहचविण्यासाठी पाणी वितरण करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेला नियोजन करण्याचेही निर्देश दिले. विभागीय कार्यालयातील आयुक्त सभागृहात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजना संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., मनपा आयुक्त अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, कंत्राटदार कंपनीचे अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जी. श्रीकांत यांनी पाणीपुरवठा
आयुक्क्त येगडे म्हणाले, घरोघरी पाणी पोहचविण्यासाठी मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना नळ जोडणी देण्यात येणार आहे. अर्धा इंच नळ जोडणीसाठी किमान सहा हजार रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. यावेळी जी. श्रीकांत यांनी ठिकठिकाणी कॅम्प घेऊन, पॉम्पलेटच्या माध्यमातून तसेच कचरा घंटागाडीद्वारे ऑडिओच्या माध्यमातून जनजागृती करावी, अशा सूचना केल्या. तसेच या योजनेंतर्गत उर्वरित कामे गुणवत्तापूर्वक करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












