औरंगाबाद – दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. प्रत्येक घर या सणाला दिव्यांनी उजळून निघते. तेजाचा तिमीरावर हा विजय मानला जातो. या निमित्ताने व्यापारी आपल्या वहीखात्याची नव्याने सुरुवात करतात. लहान मुले नवे कपडे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने दिवाळीचा आनंद द्विगुणीत करतात. लहान मुलांसाठी दिवाळी म्हणजेे मिठाई, नवे कपडे आणि फटाकेे. दिवाळी फक्त भारतातच साजरी होत नाही तर विदेशातही दिवाळीचा उत्साह मोठा असतो. दिवाळी म्हणजे दिव्यांची श्रृंखला. अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा, अज्ञानावर ज्ञानाचा विजय आहे. औरंगाबाद शहरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. औरंगाबादची प्रमुख बाजारपेठ गुलमंडीवर आज व्यापाऱ्यांची नवीन वहीखात्यासाठी चोपड्या खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे.
केव्हा आहे लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त
दिवाळीच्या पाच दिवसांच्या पर्वात आज
लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. ६ नोव्हेंबरला
नरकचतुर्दशी साजरी झाली. यादिवशी अभ्यंगस्नान आणि यम पूजा करण्याची परंपरा आहे.
भारतीय कॅलेंडरनुसार दरवर्षी दिवाळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमवस्येला
साजरी केली जे. यंदा ही अमवस्या ६ नोव्हेंबरच्या रात्री १०.२७ वाजता सुरु झाली
असून ७ नोव्हेंबर रात्री ९.३१ पर्यंत असणार आहे.
लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त
लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त १ तास ५८ मिनिटांचा
आहे. या दरम्यान घराघरात लक्ष्मी आणि गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते.
लक्ष्मीपूजनचा शुभ मुहर्त सायंकाळी ६.१२ ते रात्री ८.१० पर्यंतचा आहे.
















