सागर प्रकाशनचे C साजवार्ता
Page No.: 6 Date: 05/11/2026
1.th .in
15.17
वर्ग ४ कर्मचाऱ्यांना ५ हजार सानुग्रह अनुदान
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी आणि दिव्यांग बांधवांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मनपाच्या वर्ग-४ कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान, तर बालवाडी-अंगणवाडी शिक्षिका व अन्य पात्र कर्मचाऱ्यांना ३,५०० रुपये दिवाळी भेट दिली जाणार आहे. याशिवाय मनपा कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये अग्रिम, तर दिव्यांग लाभार्थ्यांना चार महिन्यांचा भत्ता अदा करण्यात येणार आहे. महापौर समीर राजूरकर यांनी बुधवारी पत्रकार
महालिंका छत्रपती संभाजीनगर
परिषदेत ही घोषणा केली.
पत्रकार परिषदेला उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेता समीर साजिद बिल्डर, आयुक्त अमोल येडगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे आदींची उपस्थिती होती. यापूर्वी वर्ग-४ कर्मचाऱ्यांना ३ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत होते. यामध्ये यंदा वाढ करून आता सरसकट ५ हजार रुपये
दिव्यांगाना ४ महिन्यांचा भत्ता
दिव्यांग विकास योजनेंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने एकूण ४ हजार ५८९ दिव्यांग लाभार्थ्यांना चार महिन्यांचा दिव्यांग भत्ता देण्यात येणार आहे. यासाठी ३ कोटी ६६ लाख ८१ हजार ५०० रुपये अदा करण्यात येणार आहेत. शहरातील ५२०० दिव्यांगांची नोंदणी झालेली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दैनिक वेतनावरील वर्ग ३ व ४ कर्मचारी, शिक्षण विभागातील बालवाडी शिक्षिका, तासिका तत्त्वावरील माध्यमिक शिक्षक, आरोग्य विभागातील लिंक वर्कर सुपरवायझर आणि बचत गटातील सफाई मजुरांना दिवाळी भेट म्हणून ३,५०० रुपये देण्यात येणार आहेत. यापूर्वी त्यांना २ हजार दिले जात होते.
मनपा कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये अग्रिम स्वरूपात देण्यात येणार आहेत. महानगरपालिका व शिक्षण विभागातील एकूण ९९८ कर्मचारी, वर्ग-४ मधील २ हजार ४५२ कर्मचारी, तसेच पात्र दैनिक वेतनावरील ११ कर्मचारी, शिक्षण विभाग १०६, आरोग्य विभाग लिंक वर्कर ०४ व बचत गट सफाई मजूर ३५२ लाभार्थीना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













