दिवाळी विशेष : ग्रीन फटाक्यांची शहरात धूम , बाजारात फटाके दाखल; व्यापारी वर्गाची लगबग

Foto
उज्ज्वला साळुंके

छत्रपती संभाजीनगरः दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा यंदाही जोपासली जात आहे. फटाक्याशिवाय दिवाळी साजरी होऊ शकत नाही. त्यामुळे दिवाळीच्या उत्सवात मोठ्या प्रमाणावर शहरात फटाके विक्रीसाठी दुकाने थाटली जातात. ही परंपरा दरवर्षीप्रमाणे यंदाही कायम ठेवली आहे. यावर्षी देखील दिवाळी सणाच्या निमित्ताने फटाके विक्रीसाठी आणली गेली आहेत. यंदा प्रदूषणरहीत फटाक्यांचे सर्वाधिक आकर्षण आहे. त्यामुळे यंदा ग्रीन फटाक्यांची बाजारात धूम आहे. अशी माहिती कलाग्राम फटाका असोसिएशनचे अध्यक्ष मनोज गायके यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली.

दिवाळीच्या निमित्ताने फटाका मार्केटमध्ये यंदा ग्रीन फटाक्यांची धूम आहे. फटाका बाजार यंदा पूर्णपणे सज्ज झाला आहे. यंदा बाजारात प्रदूषणमुक्त (ग्रीन क्रॅकर्स) आणि कमी आवाजाच्या फटाक्यांना ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी आहे. पर्यावरण कायद्यांचे पालन करत प्रशासनाने शहरातील विविध भागांमध्ये फटाका विक्रीला परवानगी दिली आहे. दिवाळीचा मोठा उत्साह आहे. यंदा ग्रीन क्रॅकर्स म्हणजेच प्रदूषण कमी करणाऱ्या फटाक्यांना प्राधान्य दिले जात आहे. फॅन्सी फटाके जे लहान मुलांसाठी बाजारात रंगीत सुरसुरी (स्पार्कलर्स), लवंगी, भुईचक्कर, अनार तसेच सेवन शॉट आणि अन्य आकाशात रंग उधळणाऱ्या फॅन्सी फटाक्यांची मोठी आवक झाली आहे. तसेच कमी आवाजाचे फटाके आहे. कमी आवाजाचे आणि आकर्षक रंग देणारे फटाके खरेदी करत आहेत.

ब्रँडेड फटाके दहा टक्क्यांनी महागले

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किंमती साधारणपणे 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात ब्रँडेड फटाक्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या ब्रँड़ेड फटाक्यांची किंमती मात्र दहा टक्यांनी वाढल्या आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे. असे असले तरी यंदा फटाके खरेदीवर सर्वाधिक ग्राहक भर देत आहेत. सुरसुरी आणि फुलबाजी यांसारख्या लहान फटाक्यांचे पॅकेट तसेच बॉम्ब आणि मोठ्या अनारला मागणी आहे. बाजारात यंदा विविध प्रकारचे फटाके दाखल झाले आहे. त्यात विशेष करून कमी आवाजाचे, प्रदूषणरहीत फटाके बनविण्यावर सर्वाधिक कंपनीनी भर दिलेला आहे. यंदा विविध प्रकारच्या रंगीबेरंगी सुरसुऱ्या, बटरफ्लाय, लसुनी फटाका, अनार, आकाशात जाणारे फटाके, भुईचक्कर, विविध प्रकारच्या फटक्याची लड सह आदी फटाके विक्रीसाठी बाजारात सज्ज झाले आहेत.

फटाके मार्केटमध्ये चांगला उत्साह: मनोज गायके

यंदा मोठ्या प्रमाणात फटाके विक्रीसाठी आणली गेली आहे. व्यापारी वर्गात देखील त्यामुळे मोठा उत्साह आहे. याशिवाय ग्राहकांकडून देखील मोठ्या प्रमाणात फटाके खरेदीवर भर दिला जात आहे. यंदा फटाके खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला उत्साह आहे. गेल्या पाच दिवसापासून फटाके खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. यंदा फटाके चांगल्या प्रकारे खरेदी होईल अशी अपेक्षा कलाग्राम फटाका असोसिएशनचे अध्यक्ष मनोज गायके यांनी व्यक्त केली.