आमदार सुरेश धससह नगराध्यक्ष दिपाली जाधव यांनी घेतले मनोभावे दर्शन
पैठण, (प्रतिनिधी) आठ दिवसाचा पाई प्रवास पार करत संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमी आपेगाव येथील पालखी सोहळा बिड जिल्यातील पाटोदा येथे पोहोचल्यावर पाटोद्याचे आमदार सुरेश धस तसेच नगराध्यक्ष दिपाली राजेंद्र जाधव यांनी दर्शन घेवुन पुढील वाटचालीस वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार सुरेश धस म्हणाले की, आपेगाव ते पंढरपूर पालखी मार्गासाठी शासन दरबारी प्रश्न उपस्थिती करुन रस्ता, ईतर सुविधा शासनाच्या वतीने पुरवण्यात येईल असे आश्वासन दिले. याठिकाणी संत ज्ञानेश्वराच्या पालखीचे पाटोदा नगरीत नगरपंचायतच्या वतीने नगराध्यक्ष दिपाली राजू जाधव यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी करत पारंपरिक वाद्ये वाजत भव्य स्वागत केले. दरम्यान चुभंळीचा अवघड घाट पालखीने पार करत घाट माथ्यावर बाल वारकर्यांनी रथाची प्रतिकृती साकारली तसेच यावेळी महीला भाविकांनी फुगडीचा आनंद घेतला.
ज्ञानेश्वर महाराज संस्थान अध्यक्ष ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेला पालखी सोहळ्याचे यंदा ८४८ वे पाई दिंडीचे वर्षे आहे. पाटोदा येथे मुख्य चौकात माऊलीच्या रथावर फटाक्याची रोषणाई करण्यात आली होती. हलगीचा ताल, डिजेचा निनाद, फटाक्याची अतीषबाजी, व टाळमृदंगाच्या ठेक्याने परीसर दणानुन गेला असता वारकर्यांनी फुगडी सह आनंद घेतला. भ.प.भानुदास महाराज कोल्हापूरकर, राम महाराज तांबे, आपेगावचे ग्रामस्थ शिवाजी बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब औटे, माजी व्हाचेअरमन राम पाटील औटे, स्वाभिमानी चे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक सुर्यकांत काळे, यांची उपस्थिती होती.














