साजवार्ता
सागर प्रकाशनचे
Page No.: 6 Date: 15/11/2026
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पत्नीकडे ठेवण्यासाठी दिलेल्या एक ते दीड लाख रुपयांच्या परतफेडीवरून डॉक्टरला मारहाण करण्यात झाली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू उत्तमराव लोंखडे (वय ४३, व्यवसाय डॉक्टर, रा. एन ६, बजरंग चौक, साईबाबा भक्त सेवाधाम सोसायटी, सिडको) यांनी याप्रकरणी फिर्याद
दिली आहे. १२ नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या राहत्या परिसरात हा प्रकार घडला. फिर्यादी यांनी आरोपीकडे ठेवण्यासाठी एक ते दीड लाख रुपये दिले होते. दरम्यान पैशांची गरज असल्याने त्यांनी संबंधित महिलेकडे पैशांची मागणी केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी महिलेने फोन करून गणेश दिनकर घोरपडे आणि यश राजेश भालेराव यांना बोलावून
घेतले. तिघांनी मिळून फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी गणेश घोरपडे याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डाव्या डोळ्याला आणि उजव्या कानाला मारून जखमी केले. तसेच दवाखाना बंद करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












