डोनाल्ड ट्रम्प यांची नुसती बडबड, इराणचा इस्त्रायलवर मोठा हल्ला !!

Foto
तेहरान : इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. आज डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीची घोषणा केली जाईल, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात सर्वकाही उलटे घडले. उलट डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यात इराणवरील हल्ले अधिक घातक करू म्हटले. इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम सर्वच देशांवर होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले अधिक घातक करू म्हटल्यावर जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. बॅरलच्या किमतीत वाढ झाली. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, होर्मुज खाडी खुली केल्यानंतर आपोआप तेलाच्या किमती कमी होतील. हेच नाही तर त्यांना होर्मुज खाडीची गरज नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने जगाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेक देश संकटात असून कच्चे तेल आणि एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुजच्या मुद्द्यात हातवर केल्याचे बघायला मिळतंय. 21 युद्धनौकांनी इराणला अमेरिकेने वेडले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यात इराणवरील हल्ले अधिक घातक होतील, असे म्हटल्यानंतर इराणने थेट मोठी प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे फक्त बोलूनच नाही तर इराणकडून थेट ॲक्शन घेत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा संदेश देण्यात आला. युद्ध थांबवण्याची मागणी जग करत असताना युद्ध अधिक भडकले आहे.

इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर थेट इस्त्रायलवर मोठा क्षेपणास्त्र मारा करत हल्ला केला. ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत ट्रम्प यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर लगेचच हा हल्ला झाला. एकप्रकारे इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांना संदेश देणयात आला की, या आम्ही देखील मैदानात आहोत.

आतापर्यंतच्या या युद्धात इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणच्या प्रमुख अधिकाऱ्यांना टार्गेट करून हल्ले करण्यात आली. इराण युद्धात मागे पडल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक दावे केले. अमेरिका विजयाच्या अत्यंत जवळ असल्याचे त्यांनी म्हटले. इराण देखील खंबीरपणे उभा असल्याने युद्ध अधिक लांबण्याचे मोठे संकेत आहेत.

अमेरिकेचे -15 फायटर जेट थकले, इराणच्या ड्रोनला रोखू शकला नाही...
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने आता एक नवे वळण घेतले आहे. इराकच्या आकाशात अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली मानले जाणारे -15 फायटर जेट आणि इराणचे स्वस्त शाहेद ड्रोन यांच्यात टॉम अँड जेरी सारखा खेळ पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, 80 मिलियन डॉलरचे विमान एका स्वस्त ड्रोनला रोखण्यात अपयशी ठरल्याने अमेरिकेच्या संरक्षण तंत्रज्ञानावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अमेरिकेचे -15 फायटर जेट इराणच्या शाहेद ड्रोनचा पाठलाग करत आहे. मात्र, इराणच्या या ड्रोनने अत्यंत चपळाईने फायटर जेटला चकवा दिला आणि इराकमधील एरबिल येथील एका ब्रिटिश ऑईल कंपनीच्या (कॅस्ट्रोल फॅसिलिटी) तळावर यशस्वीरीत्या हल्ला केला. या हल्ल्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले असून परिसरात भीषण आग लागली होती.

असमतोल हवाई युद्ध?
इराण समर्थक सोशल मीडिया हँडल्सवरून हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, आता महागड्या युद्धविमानांचा काळ संपत चालला असून स्वस्त ड्रोन तंत्रज्ञान जगावर राज्य करेल. 80 मिलियन डॉलरचे फायटर जेट विरुद्ध काही हजार डॉलरचे ड्रोन आणि विजय ड्रोनचाच झाला,ङ्घङ्घ अशा कॅप्शनसह हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
दरम्यान, अमेरिका-इराण युद्धाच्या 34 व्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केले. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, येत्या 2 ते 3 आठवड्यांत अमेरिकन सैन्य इराणमधून बाहेर पडेल. आमचे जे उद्दिष्ट होते ते पूर्ण झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, जाण्यापूर्वी इराणवरील हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढवली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.