खुलताबाद, (प्रतिनिधी) मते मिळविण्याकरिता धर्म, जात, वर्ग अथवा गट यांच्या भावनांना आवाहन केले जाणार नाही. कोणत्याही प्रार्थनास्थळांचा निवडणूक प्रचाराचे व्यासपीठ म्हणून वापर केला जाणार नाही. तसेच कोणत्याही प्रार्थना स्थळांचा निवडणूक कामासाठी वापर करता येणार नाही. विशिष्ट जाती, जमाती, धर्माच्या सभा घेण्यात येऊ नयेत व आदर्श आचारसंहितेचे पालन करावे अशे अव्हाण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्यधिकारी समीर शेख यांनी नगरपरिषद सभागृहात घेतलेल्या बैठकीत केले.
खुलताबाद नगरपालिका निवडणूक घेत असतांना कायदा व सुव्यवस्था बाधीत होवू नये, तसेच आदर्श आचार संहितेचे पालन व्हावे, या दृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी, स्वरूप कंकाळ यांच्या सुचने नुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शेख यांनी शनिवारी रोजी सकाळी अकरा वाजता खुलताबाद नगरपरिषद सभागृह येथे शहरातील मान्यवरांची इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली या बैठकीत समीर शेख म्हणाले कि, प्रचारा दरम्यान इतर राजकीय पक्षांवर टीका करण्यात येईल तेव्हा ती पक्षांची धोरणे किंवा कार्यक्रम, त्यांचे पूर्वीचे कार्य यांच्यापुरती मर्यादित असेल. पक्षाच्या नेत्यांच्या किंवा कार्यकत्यांच्या सार्वजनिक कामांशी संबंधित नसलेल्या, खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टिका करण्यापासून, पक्ष आणि उमेदवार दूर राहतील. बिनबुडाचे आरोप आणि विपर्यस्त माहिती यांच्या आधारावर पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर टीका केली जाणार नाही.
प्रार्थना स्थळांचा वापर करू नये :
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शेख पुढे म्हणाले कि मते मिळविण्याकरिता धर्म, जात, वर्ग अथवा गट यांच्या भावनांना आवाहन केले जाणार नाही. कोणत्याही प्रार्थनास्थळांचा निवडणूक प्रचाराचे व्यासपीठ म्हणून वापर केला जाणार नाही. तसेच कोणत्याही प्रार्थना स्थळांचा निवडणूक कामासाठी वापर करता येणार नाही. विशिष्ट जाती, जमाती, धर्माच्या सभा घेण्यात येऊ नयेत तसेच मतदारांना प्रलोभन. धाक मतदारांना लाच देणे,
वस्तूंचे, पैशाचे, मद्याचे वाटप करणे, मतदारांना धाकदप मतदारांची तोतयेगिरी, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळच्या १०० मीटर्स क्षेत्रामध्य या बाबी कारवाईस पात्र ठरतील. मतदानापूर्वी जाहीर प्रचार बंद करण्यासंबंधी तरतुदींचे पालन करावे.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची पत्रकार परिषद :
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शेख यांनी दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक संदर्भात सखोल अशी माहिती पत्रकारांना दिली या दरम्यान उमेदवारी अर्ज प्रक्रिया व आचार संहिता तसेच नगराध्यक्ष व सदस्य यांच्या प्रचाराचा खर्च तसेच दुबार मतदार तसेच निवडणूक संदर्भात विविध विषय संदर्भात माहिती दिली.
नगराध्यक्ष व सदस्य प्रचाराचा खर्च :
नगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा खर्च ठरवून देण्यात आला आहे या मध्ये
क वर्गाच्या खुलताबाद नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी साडेसात लाख रुपये तर सदस्य पदाच्या निवडणूकसाठी अडिच लाख रुपये खर्च ठरवून देण्यात आला आहे.
उमेदवार अर्ज प्रक्रिया : सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शेख माहिती देताना सांगितले की निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे खुलताबाद नगरपरिषद कार्यालयात निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरता येणार असून १७ नोव्हेंबरला दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत असणार आहे १८ नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता उमेदवार अर्जाची छाननी केली जाईल, व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, न्यायालयात अपील नसेल तर १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे,
कुठल्याही न्यायालयात अपील असेल तर दिनांक २१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर अर्ज माघारी घेता येणार आहे, तसंच २६ नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार असून याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे खुलताबाद शहरात एकूण १९ मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार असून शहरात एकूण १४ हजार ७७५ मतदार आहे २ डिसेंबरला सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरवात होणार असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे मतमोजणी हि नगरपालिका येथे दिनांक ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे
दुबार मतदारांची तपासणी करून मतदान :
एका खास प्रक्रियेच्या माध्यमातून दुबार आणि तिबार मतदाराची तपासणी केली जाणार असून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे अवैध मतदान होणार नसल्याची काळजी घेतली जाईल, विकसित केलेल्या एका विशिष्ट टूलमार्फत प्रत्येक प्रभागात संभाव्य दुबार मतदार नावाबाबत तिथं अधिकारी संबंधित मतदारांशी संपर्क साधून ते मतदार कुठल्या मतदान केंद्रात मतदान करेल याची माहिती घेणार आहे















