औरंगाबद दि.10 (सांजवार्ता ब्युरो) : निर्घृणपणे सख्ख्या बहीण- भावाचे गळे चिरून शहराला हादरून टाकणाऱ्या दुहेरी हत्याकांड घडले.या हत्याकांड मागे ओळखीचा कोणी व्यक्ती आहे का?, चोरी चा उद्देश का? अशी असंख्य पदरे समोर येत असून या सर्वांचा शोध पोलीस यंत्रणेकडून सुरू असून तापासासाठी चार पथके तैनात करण्यात आले आहे लवकरच आरोपी अटकेत राहील असा विश्वास पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी व्यक्त केला आहे. किरण राजपूत(वय-18) आणि सौरभ राजपूत (वय-16) या दोन्ही बाहू-बहिणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी रात्री समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.आज सकाळी या दुहेरी हत्याकांडाच्या तपासला गती मिळाली फॉरेन्सिक टीम ने आज सकाळीच घरातील सर्व साहित्याचे फॉरेन्सिक नमुने गोळा केले. दरम्यान उप आयुक्त डॉ.राहुल खाडे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र मळाळे हे सकाळ पासून घटनास्थळी हजर होते, श्वान पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले.त्यावेळी श्वान स्वीट्टीला गंध दिल्यानंतर ती घरातील कंपाउंड च्या उजव्या बाजूला गेली असता तेथे तिला एक रुमाल भेटला त्या मध्ये एक 100 रुपयांची नोट व हातातील बांगडी मिळाली त्या नंतर ती बाहेर आली घराबाहेरील भिंतीलगत घुटमळली मारेकऱ्यांना त्या भिंती जवळ मोटार सायकल उभी केली असावी व तेथून पळ काढला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटने बाबत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले की, सध्या हे पूर्णपणे ब्लाइंड मर्डर आहे.या घटनेत मौल्यवान वस्तू चोरीला गेले आहे.शिवाय गुन्ह्यात वापरन्यात आलेला हत्यार अजून मिळालेला नाही. आरोपोंच्या शोधा साठी चार पथके तैनात करण्यात आली आहे. लवकरच आरोपो पकडण्यात यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन्ही मृतदेह शवविच्छेदन साठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालवर बरेच धागेदोरे पोलिसांच्या हातात येऊ शकतात.शिवाय दोन्ही मयत वापरात असलेल्या मोबाईल क्रमाकाची कुंडली काढण्यात येत आहे.शवविच्छेदन आणि मोबाईल डेटा अहवाल समोर आल्यानंतर तपासात पोलिसांना मदत होणार आहे असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगीतले तर या गुन्ह्याचा मागावर असलेल्या गुन्हे शाखेच्या एका अधिकाकाऱ्याने सांगितले की, दुहेरी हत्याकांड मागे अनेक अँगल समोर ठेऊन सध्या तपास सुरू आहे.परिसरातील सीसीटीव्ही तपासणी चालू आहे. यात कौटुंबिक शत्रुत्व, आर्थिक व्यवहार, मायतांची फ्रेंडसर्कल, व चोरी अशा विविध अँगलने तपास चालू आहे.
घरात मारहाण झटापटीच्या खुणा नाहीत..
लूटमार, दरोडा, हत्या प्रकरणात अनेक ठिकाणी घरातील समान अस्ताव्यस्त असणे भिंतीवर रक्त उडणे, असे दृश्य असते मात्र दोन्ही मुलांचे मृतदेह हे बाथरूम मध्ये आढळले. व पोलिसांना घरात चार चहा चे कप आणि एक ग्लास सदृश्य वस्तू दिसली.शिवाय घरात प्रवेश करण्यासाठी मारेकऱ्यांनि खिडकी किंवा दरवाजा तोडून प्रवेश केलेला प्रथमदर्शनी समोर येत नाही,यामुळे तेथे ओळखीचे कुणी तरी आले असावे. असा दाट संशय पोलिसांना आहे. गुंगीचे औषध किंवा बेशुद्ध करून दोघांना बाथरूम जवळ नेऊन ही हत्या करण्यात आली असावी? मात्र याचा दुजोरा शवविच्छेदन अहवालात स्पष्ठ होईल.