आकांक्षा खून प्रकरणात पोलिसांना धागेदोरे सापडेनात, रुमभोवती फिरत आहे तपास

Foto

औरंगाबाद- एमजीएममधील मुलींच्या वसतिगृहाची सुरक्षा व्यवस्था भेदून डॉ. आकांक्षा अनिल देशमुख (२२) या विद्यार्थिनीचा खून झाला. खुनाचा उलगडा ४८ तासांनंतरही पोलिसांना करता आला नाही. दोन दिवस उलटूनही पोलिस रुम भोवतीच तपास करीत आहेत.

 

आकांक्षा ही एमजीएम फिजिओथेरपी कॉलेजमध्ये मास्टर्स ऑफ फिजिओथेरफी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. एमजीएम कॅम्पसमधील गंगा मुलींच्या वसतिगृहात ती राहत होती. ११ डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ ते पावणे दहा वाजेच्या सुमारास आकांक्षा तिच्या रूममध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिच्या शरीराला मुंग्या लागल्या होत्या. ही माहिती पोलिसांना न कळविता उपस्थितांनी लगेच आकांक्षाला एमजीएममधील अपघात विभागात दाखल केले. डॉक्टरांनी आकांक्षाला तपासून मृत घोषित केले. अखेर शवविच्छेदनातील प्राथमिक अहवालानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवुन तपासाला सुरूवात केली. ४८ तास उलटुन ही पोलिसांना या प्रकरणात धागेदोरे सापडले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चाना उधान आले आहे.