सिल्लोड (प्रतिनिधी) : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासह अत्याधुनिक सामाजिक सभागृह उभारणी तसेच परिसरात नव्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचे पुतळे उभारण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. या सर्व कामांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील नागसेन बुद्ध विहार येथे वर्षावास समारोप व कठीण चिवरदान २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार अब्दुल सत्तार आणि भिक्खू रत्नदीप
महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला प्रगल्भ आणि सर्वसमावेशक राज्यघटना दिली. त्यांच्या महान कार्यामुळे जगभरात भारताचा सन्मान उंचावला आहे. त्यांनी दिलेला ङ्गशिका, संघटित व्हा आणि संघर्ष कराफ हा मूलमंत्र आजही समाजाला प्रगतीची दिशा देणारा आणि प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.
या कार्यक्रमानिमित्त दिवसभरात ध्वजारोहण, धम्मरॅली, पूजापाठ व परित्राणपाठ, भिक्खू संघाचे भोजनदान आणि धम्मदेसना आदी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका राजश्री निकम, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, नगरसेवक जुम्मा खा. पठाण, सुधाकर गायकवाड, जितू आरके, अमित आरके, संतोष शिनगारे, प्रकाश हिवराळे, कडूबा दुबे, प्रभाकर पारधे, जगदीश बेदवे, दयानंद आरके, संदीप दांडगे, शिवा टोपे, जगन्नाथ कुदळ, प्रा. विजय वाकेकर, शेषराव आरके, जी.एस. आरके, विनोद पगारे, फहिम पठाण, उत्तम सोनवणे, डॉ. बिरारे, तानाजी आरके, संजय भिवसन आरके, साहेबराव आरके, सुनील आरके, किशोर जाधव, राजू जमधडे, देविदास दांडगे, सुनील पांडुरंग दुधे, आकाश आरके आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.















