डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राष्ट्रीय सण म्हणून साजरी व्हावी : आ. अब्दुल सत्तार

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजाप्रती असलेले अमूल्य योगदान लक्षात घेता त्यांची जयंती राष्ट्रीय सण म्हणून साजरी व्हावी, असे मत आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
बाबासाहेबांनी प्रत्येक समाजघटकाला न्याय दिला असून संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी अर्पण केले. त्यांच्या संविधानामुळेच माझ्यासारख्या सामान्य माणसाला आमदार व मंत्री होण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 

तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून ते आधुनिक भारताचे खरे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते कमलाकांत काळे यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रसिद्ध व्याख्याते कमलाकांत काळे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार व व्याख्याते काळे बोलत होते.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, न. प. चे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, नायब तहसीलदार तुकाराम बनकर यांच्यासह कृउबा समितीचे संचालक तथा नगरसेवक नंदकिशोर सहारे, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, न.प.तील शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, नगरसेविका राजश्री निकम, मनीषा जितेंद्र आरके, सिद्धेश्वर आहेर, शेख बाबू, विशाल जाधव, जुम्मा खान पठाण, सुधाकर गायकवाड, नूर मोहम्मद कुरेशी, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सयाजीराव वाघ, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख दुर्गाबाई पवार आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

 काळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात मोठे योगदान देत वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी समानता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाला एक मजबूत लोकशाही व्यवस्था दिली. त्यांच्या विचारांमुळे समाजात परिवर्तनाची नवी दिशा निर्माण झाली. प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान उत्सव समितीच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

सत्कार स्वीकारताना त्यांनी उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले. कार्यक्रमास संजय आरके, जितू आरके, अमित आरके, राजेश्वर आरके, मनोहर आरके, संजय भिवसन आरके, नारायण फाळके, राजू बनसोड, संतोष धाडगे, जगदीश बेदवे, प्रभाकर पारधे, शेषराव आरके, तेजराव आरके, प्रकाश आरके, उत्तम आरके, कैलास आरके, बंडू आरके, देविदास दांडगे, भारत आरके, सचिन गोरे, सखाराम आहीरे, अशोक कांबळे, जगन्नाथ कुदळ, फहीम पठाण, रवी गायकवाड, जीएस आरके, प्रदीप आरके, रोहित आरके, राजेंद्र आरके, धम्मा दांडगे, अशोक गवई, संतोष काळे, कुणाल सहारे, गौरव सहारे, संजय मुरकुटे आदिंसह शहरातील विविध भागांतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.