अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी डॉ. भारत झारगड

Foto
पैठण, (प्रतिनिधी) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त पैठण तालुका सार्वजनिक जयंती उत्सव २०२६ ची बैठक ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकात झाली. सर्वानुमते जयंती उत्सव नामितीच्या अध्यक्षपदी डॉ. भारत झारगड यांची निवड करण्यात आली आहे.

 उपाध्यक्षपदी सुनील वीर, महादेव खंडागळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पैठण येथे मागील वर्षी खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून हुतात्मा स्मारक येथे भव्य दिव्य पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. यावर्षी ३१ मे रोजी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त पैठण तालुका जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारणी समाजभूषण जिजाभाऊ मिसाळ यांच्या उपस्थितीत मुक्त कार्यकारणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली. 

सचिवपदी जगदीश वीर, कार्याध्यक्षपदी अंकुश काळे, सहसचिवपदी संतोष धापटे, योगेश पाचे, कोषाध्यक्षपदी सुडके फिटर, नितीन काकडे, स्वागत अध्यक्षपदी राजेंद्र वाघमोडे, संचालक बंडू महाराज गाढे, चंद्रकांत झारगड, पंचायत समिती सदस्य दादासाहेब गलांडे, लालू वीर, गणेश वाघमोडे, भीमराज गाढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी मिठू नन्नावरे, संतोष देवढे, हिरामण सरोदे, मोतीलाल धुंगासे अप्पामाऊ भाँडे, बाबूराव बनसोडे, डिगंबर सुडके, आदित्य आदमाने, बाबासाहेब वाघमारे, रमेश झारगड यांचयासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.