सिल्लोड, (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डॉ. आंबेडकर नगर, सिल्लोड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्याचबरोबर डॉ. आंबेडकर नगर, सिल्लोड येथील नागसेन बुद्ध विहारचा वर्धापन दिन सुद्धा साजरा करण्यात आला. कार्यक्रमात बुद्ध वंदना घेण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म, करुणा व समतेच्या विचारांवर मार्गदर्शन केले. नामविस्तार दिनाचे ऐतिहासिक महत्त्व उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून विशद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी दिलेल्या योगदानावर वक्त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी नामविस्तार लढ्यातील शेषराव आरके, भाई पोपट पगारे, तसेच एड. जी. एस आरके, कैलास आरके, अरुण कोतकर, बंडू आरके, सखाराम आरके, प्रा. हरिभाऊ तपासे, प्रा. विजय वाकेकर, माजी उप नगराध्यक्ष संजय आरके, माजी नगरसेवक जितू भाऊ आरके, संदीप दांडगे, किशोर जाधव, गणेश आरके, प्रकाश बनकर, शेषराव म्हतारजी आरके, तेजराव आरके, सुनील पेंटर, दिलीप दांडगे, राहुल आरके, संतोष आरके, संजय रुखमाजी आरके, सुभाष सुरडकर, सीमा आरके, दिपक आरके, नंदू आरके, अनिल आरके, गजानंद आरके, संजय आरके, पांडू आरके, आकाश आरके व सामाजिक कार्यकर्ते, बौद्ध उपासक, युवक-युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.