धामोरी बुद्रुक येथून चालकाचे अपहरण करून बेदम मारहाण

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील धामोरी बुद्रुक गावातून एका खासगी चालकाचे अपहरण करून त्याला लाकडी दांड्याने व लाथा बुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी वाळूज पोलिसांत एका संशयितासह तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे.

बिडकीन (ता. पैठण) येथील चालक बाळासाहेब खासगी
भाऊसाहेब हापसे (वय ३५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत भानुदास चव्हाण (वय ३५, रा. बऱ्हाणपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे. मंगळवारी (ता. २६) सातच्या सुमारास आरोपींनी धामोरी परिसरातून फिर्यादीचे अपहरण केले. लासूर नाका येथील मोकळ्या जागेत नेऊन ठार मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. 

जखमी हापसे यांनी वाळूज पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार दिली. उपनिरीक्षक जोगस यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. तपास उपनिरीक्षक रमेश राठोड करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे व पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी तपासाचा आढावा घेत आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश तपास पथकाला दिले आहेत.