महादेव जानकर यांच्याकडून पैठण तालुक्यात दुष्काळी पाहणी

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : तालुक्यातील दावरवाडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी दावरवाडी शिवारात अशोक भाऊ सरगर यांच्या शेतात तसेच शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. 

अस्मानी संकटामुळे कापूस उत्पादक शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. शेतकऱ्यांचे हे दुःख पाहून जानकर तातडीने शासनाकडे हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची आग्रही मागणी केली आहे. हा पाहणी दौरा पूर्ण होताच, ते स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्या मांडणार आहेत आणि सरकारला मदत देण्यास भाग पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय समाज पक्ष नेहमीच बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि शेवटच्या माणसाला मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील. यावेळी अजित पाटील, माऊली नाना सलगर, ओमप्रकाश चितळकर, अश्रुबा कोळेकर, प्रकाश दिलवाले, जिल्हाध्यक्ष अशोक सरगर, कृष्णा जाधव, भाऊसाहेब सोनवणे, संतोष सोनवणे, शिवाजी जाधव, सचिन जाधव, किशोर जाधव, गणेश भुजबळ, महेश दिलवाले, सोपान महालकर, ओमकार राजळे, रामेश्वर सोरमारे, दत्ता चोरमारे, दत्ता दिवटे, मीठू चोरमले, मिठू नन्नवरे, गोपाल धारे, शेखर धारे, विष्णू सोरमारे, अंबादास खोलासे, किशोर डोईफोडे आणी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.