ड्रगमाफिया अश्फाक पटेलचा माज उतरवला

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : दमदाटी आणि दादागिरी करून अनेकांना ड्रग्ज सिंडिकेटमध्ये गुंतविणार्‍या मास्टरमाइंड शेख अश्फाक शेख इसाक ऊर्फ अश्फाक पटेल आणि टोळीची शहर पोलिसांनी अखेर धिंड काढली. ज्या शहाबाजारमधून तो हे अख्खे सिंडिकेट चालवित होता त्याच ठिकाणी तपासकामी फिरवून पोलिसांनी त्याचा माज उतरविला. त्याच्यासोबत पठाण दाऊद मुनावर खान आणि सरफराज मिर्झा हाफिज बेग हे दोघेही होते.
२४ जानेवारीला शहर गुन्हे शाखेने अश्फाकच्या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला होता. त्याच्या टोळीतील २८ आरोपींवर गुन्हे दाखल असून सुमारे २२ आरोपींना अटक केलेली आहे. आतापर्यंत ५३ ग्रॅम एमडी आणि ११ हजार ७९९ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात सिटी चौक आणि जिन्सी या दोन ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.