भररस्त्यात मद्यधुंद तरुणाचा राडा

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः पैठणला जाणार्‍या ई बसमध्ये मद्यधुंद तरूणाने राडा घातला. ही घटना शनिवारी (दि.७) सातच्या सुमारास मिल कॉर्नर ते कार्तिकी चौकादरम्यान घडली. एक तळीराम मद्यधुंद अवस्थेत बससमोर असा उभा राहिला की चालकाला बस थांबवावी लागली. हा तळीराम काही केल्या बाजूला होत नव्हता. त्यामुळे ऐन वर्दळीच्या रस्त्यावर सुमारे पाच ते सहा मिनिटे वाहतूक झाली विस्कळीत झाली होती.
बस आगारातून ई बस पैठणला जाण्यासाठी बाहेर पडली. ती मिल कॉर्नरला वळसा घेत मुख्य रस्त्याने निघाली असता बससमोर अचानक तळीराम प्रगटला. तळीरामामुळे बस थांबवावी लागली. त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न नागरिकांनीही चालकासह इतर केला, परंतु तो बाजूला हटण्यास तयारच नसल्याने बसचालकासह इतर चालकांची चांगलीच दमछाक झाली. तळीरामाच्या या अवतारामुळे मिलकॉर्नर ते कार्तिकी चौक हा मार्ग सात मिनिटे विस्कळीत झाला होता.