रमेश लिंबोरे
पैठण : तालुक्यातील खेरडा प्रकल्प कोरडा पडल्याने या भागातील ५५ गावात पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेला असताना नाथ सागर जलाशयाचे दरवाजे उघडून पाणी खेरडा प्रकल्पात न सोडता गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले, असल्याचा मूर्खपणा गोदावरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. ऑक्टोबर महिन्यातच हा प्रकल्प कोरडा पडला आहे यामुळे ५५ गावात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
पिके वाचविण्यासाठी आणि उपलब्ध ओलावा टिकवून ठेवण्यासाठी जायकवाडी धरणातून सिंचनासाठी ब्रम्ह गव्हाण योजनातुन खेर्डा प्रकल्पात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार विलास भुमरे यांच्या कडे करण्यात आली आहे. ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांनी ही योजना मार्गी लावल्याने या भागातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटला कमी करण्यास मदत झाली असून, जवळपास १४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे, खासदार संदिपान भुमरे व विलास भुमरे यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पंप सुरू झाल्यानंतर काही भागांतील शेतांपर्यंत पाणी पोहोचले. त्यामुळे पिकांना आधार मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान असुन आता खेर्डा प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-- पिके वाचविण्यासाठी नियोजनाची गरज --
पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीचे गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीत ब्रह्मगव्हाण योजनेच्या माध्यमातून नियमित पाणीपुरवठा होणे आणि नाथसागर जलाशयातून सिंचनासाठी पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. योजनेतील उर्वरित कामे पूर्ण करून पाणीवितरण सुरळीत केल्यास टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो त्या अनुषंगाने पाणी खेर्डा प्रकल्पात सोडण्यात यावे असे शेतकरी बद्रीनाथ गोर्डे, बद्रीनाथ बोंबले यांनी सांगितले.
-- तालुक्यातील सुमारे ५५ गावांतील पाणीटंचाई --
त्यामुळे जलसंपदा विभागाने परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार विलास भुमरे यांच्या कडे केली आहे. आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री यांच्याकडे खेर्डा प्रकल्पात पाणी सोडले जावे यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत असल्याची माहिती आप्पासाहेब निर्मळ यांनी केली आहे.
नाथ सागर जलाशयात सध्या ७३.६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे मात्र, धरणातील पाणीसाठा आणि प्रत्यक्ष सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. पिण्याच्या पाण्याची गरज, बाष्पीभवन आणि आगामी काळातील पाणी नियोजन लक्षात घेऊन सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे.
ब्रह्मगव्हाण योजनेमुळे निर्माण झालेला दिलासा कायम ठेवण्यासाठी नाथसागर जलाशयाच्या पाण्याचे नियोजन करण्यात येईल वेळेवर आणि नियमित पाणी मिळावे यासाठी लवकर उपलब्ध पाणी साठा व त्याचे नियोजन वर बैठक घेऊन खेर्डा प्रकल्पात पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ.
- विलास भुमरे, आमदार
















