सलग पावसामुळे भाजी पाल्यांचे भाव कडाडले

Foto
ग्राहकांना मोजावे लागतात जास्तीचे पैसे
एकीकडे कोरोनाचे सावट पसरल्याने आधीच लॉकडाऊनचा आर्थिक फटका भाजीविक्रेत्यांना बसला आहे. त्यात आता पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने भाजीपाल्याचे नुकसान झाले. याचा परिणाम भाजी पाल्याचे भाव वाढले असून. सर्वसामान्य नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. 
उन्हाळ्यात भाजीपाल्याचे भाव वाढलेले दिसतात. त्यानंतर पाऊस पडताच भाजीपाला नवीन येण्यास सुरुवात होते. त्यामुळे भाजीपाल्याचे दर जेमतेम असतात. परंतु यंदा पावसाने चांगलेच झोडपल्याने भाजीपाला खराब झाला आहे. पालेभाज्या, फळभाज्याचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे भाजीपाला दर देखील वाढले आहेत. याशिवाय बाहेरून येणारा भाजीपाला देखील कमी प्रमाणात शहरात येत आहे. त्यामुळे भाजीपाला महागला आहे. सर्वसामान्य नागरिकांना देखील भाजीपालाचे दर न परवडणारे आहेत. त्यातच दुसरीकडे कोरोनामुळे आर्थिक संकट ओढवले आहे. आधीच लॉकडाऊन असल्याने भाजीपाला, फळविक्रेत्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यात आता भाजीपाला पावसाने खराब झाल्याने देखील नुकसान झाले आहेत. 
भाजीपाला महागला
पावसाळ्यात 5 ते 10 रुपये प्रति जुडी कोथिंबीर विकली जात होती. परंतु ग्राहकांना एका कोथिंबीर जुडीसाठी 20 रुपये मोजावे लागत आहेत. इतकेच नव्हे तर एका मेथीच्या जुडी साठी 10 रुपये मोजावे लागत होते. आता प्रति मेथीच्या जुडीसाठी 15 ते 20 रुपये ग्राहकांना देण्याची वेळ आली आहे. तसेच 250 ग्रॅम शेवगासाठी 25 ते 30 रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय पालक प्रति जुडी 15 ते 20 रुपये, 250 ग्रॅम वांगे, गवार आणि दोडके घेण्यासाठी 20 रुपये द्यावे लागत आहेत. टोमॅटोसाठी देखील एक किलोसाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत. पत्तागोबी 40 ते 30 रुपये प्रति किलो, फुलगोबी 50 ते 60 रुपये प्रति किलो विकले जात आहेत. 
पावसाने भाजीपाला झाला खराब
सतत तीन दिवस पडलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले. टोमॅटोसह आदी फळभाज्या, पालेभाज्या खराब झाल्याने भाजीविक्रेत्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच कोरोनाचे संकट त्यात आर्थिक संकट अशा परिस्थितीत भाजीपाला खराब झाल्याने घरखर्च भागवावा कसा? असा प्रश्न अनेक भाजीविक्रेत्यांना पडला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker