किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

Foto
चार सख्खे भाऊ जखमी तर एकाची प्रकृती गंभीर जखमी

गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर शहरात परदेशपुरा जवळपास दोन दिवसांपूर्वी वाद आणि रस्त्यावर गाडी बाजूला घेण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर दोन गटांतील तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत चार सख्खे भाऊ जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

या मारहाणीत मोईन गफार खान (२५), फारूक गफार खान (३१), शाहरुख गफार खान (३५) आणि सोहेल गफार खान (२८) हे चौघे भाऊ जखमी झाले. त्यांच्यावर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चौघांनाही छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. त्यानंतर वाद वाढत जाऊन दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यावेळी चौघा भावांना लाठी-काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 जखमींवर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, परिचारिका धुमाळ तसेच सुरक्षा रक्षक किशोर हिवाळे यांनी उपचारासाठी परिश्रम घेतले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे खाना करण्यात आले. घटनेप्रकरणी गंगापूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.