इस्टर सन्डे साजरा होत असताना श्रीलंकेत 6 बॉम्बस्फोट, तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये घडवले हे बॉम्बस्फोट या मोठ्या स्फ़ोटा मध्ये मृत्यू चा आखडा सध्या 140 इथका आहे.

Foto


कोलंबो: जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना, श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली. कोलंबोमध्ये आज ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या बॉम्बस्फोटांमध्ये आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला असून, चारशेहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यात विदेशी पर्यटकांचा समावेशही आहे. जखमींवर उपचार सुरू असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  रविवारी (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजण्याचा सुमारास हे बॉम्बस्फोट झाले. आज ईस्टर संडे असल्याने चर्चमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. श्रीलंकेमध्ये तब्बल सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले.

 यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर तीन बॉम्बस्फोट हे फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळत आहे.   बट्टीकलोआ येथील चर्चमध्ये तर कोलंबोतील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड या दोन फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले.कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया येथील चर्चमध्येही बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात आतापर्यंत 140 नागरिक मरण पावले असल्याची माहिती असून, चारशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.  भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आपण कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे, असे त्या म्हणाल्या.