सिल्लोड, (प्रतिनिधी): मिंगरूळ येथील स्वयम् शिक्षण, प्रयोग संस्थेच्या सदस्याने राज्याच्या कृषी विभागाच्या संकल्पनेतून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या शेतकरी महिला गटाच्या माध्यमातून मंगरूळ गावात वेगवेगळ्या ठिकाणी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प तयार करून या गटाच्या महिलांनी पुरुषांच्या तुलनेत आपण कुठेही मागे नाही हे सिद्ध करून दाखवले.
पर्यवेशिका निकिता जंजाळ व सखी वंदना मरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ५० महिलांनी आजवर विविध प्रयोग राबवले आहे. चूल व मूल यावर मर्यादित न राहता झाकण्यासाठी संसाराचा गाडा हकण्यासाठी स्वावलंबनाच्या दिशेने सुरू केलेली घोडदौड वाखण्याजोगी आहे.
गांडूळ खत निर्मितीची संकल्पना राबवताना प्रकल्प व्यवस्थापक राम्राट कसबे, तालुका समन्वयक अर्चना कोळी वैशाली धुगे. पुष्या तुपे शुभम कुमावत इत्यादी अधिकाऱ्याऱ्यांच्या मार्गदर्शना खाली आखणी करून प्रकल्पसाठी केलेली मेहनत नजरेत भरणारी आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी निर्मला खेळवणे, कल्पना बहें शितल मोडेकर कीर्ती मोठेकर वर्षा बोर्ड यांनी अथक परिश्रम घेतले.












