ईद उल फित्र उत्साहात साजरी; पहिल्यांदाच औरंगाबादच्या जनतेने दोनदा ईद साजरी केली - खा. इम्तियाज जलील

Foto

औरंगाबाद: सालाबादप्रमाणे शहरातील छावणी इदगाह मैदानात लाखो मुस्लिम बांधवांनी  ईदची प्रमुख नमाज अदा करीत  एकमेकांना गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या.  यावेळी आबालवृद्धा पासून ते प्रतिष्टीत मंडळींची उपस्थिती होती.सकाळ पासूनच शहरात सर्वत्र उत्साहात ईद-उल-फित्र चा उत्साह पाहायला मिळाला.

सालाबादप्रमाणे प्रमाणे शहरातील छावणी, रोजाबाग, उस्मानपुरा या तीन इदगाह मध्ये मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र ( रमजान ईद) ची प्रमुख नमाज अदा केली. या तीन इदगाह पैकी छावणीची इदगाह मोठी असल्याने ती प्रमुख मानली जाते. आज सकाळी सात वाजेपासूनच मुस्लिम बंदजवणी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावली होती.साधारण नऊ वाजेच्या दरम्यान मुख्य नमजाला सुरुवात झाली.या नंतर  देशाच्या, शहराच्या सुरक्षिततेसाठी, शेतकऱ्यांसाठी व पावसासाठी  लाखो बांधवांनी दुवा केली. नमाज आणि दुवा संपल्यानंतर सर्व बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत पवित्र रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. या वेळी आबालवृद्धाची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

विशेष म्हणजे नमाजासाठी ईदगाह मैदानात आलेल्या बहुतांश बांधवांनी  एकाच रंगाचे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते. या वेळी मंचावर नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उप आयुक्त निकेश खाटमोडे, साह्ययक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष नामदेवराव पवार,
नवीन ओबेरॉय, माजी महापौर अशोक सायण्णा, रशीद मामु,  पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती, शेषराव उदार, छावणीचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे सह आदी ची उपस्थिती होती.

शहरासह ईदगाह भोवती पोलिसांची कडेकोट सुरक्षा
ईद उल फित्र चा सण  शांततेने पार पडावा या साठी औरंगाबाद शहर पोलिसांनी मोठी खबरदारी घेतल्याचे दिसले. औरंगाबादेतील तीन प्रमुख ईदगाह तसेच लहान-मोठ्या मशिदी, तसेच पारंपरिक आणि ऐतिहासिक मशिदीजवळ पोलिसांनी फिक्स पॉईंट लावले होते.त्याच बरोबर (क्यू.आर.टी.) शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेचे कर्मचारी, विशेष शाखा व पोलीस ठाणे स्थरावर चौका चौकात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. 

नेत्यांनी फिरविली पाठ
छावणी ईदगाह मध्ये मुख्य नामाजच्या ठिकाणी  दरवर्षी पोलीस दलाकडून स्वागत कक्ष उभारण्यात येते त्या ठिकाणी सर्वधर्मीय व सर्व पक्षीय नेते मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतात. ही परंपरा मागील अनेक दशकापसून शहरात सुरू आहे. मात्र या वर्षी राजकीय पुढाऱ्यांनी ईदगाहकडे पाठ फिरविल्याचे दिसले. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नेते उपस्थित होते.

पहिल्यांदाच रमजान मध्ये दोनदा साजरी केली ईद- खा.जलील
मुख्य नमाज अदा केल्यानंतवर प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी सर्व जनतेस ईदच्या शुभेच्छा देत.
 माझ्या सह औरंगाबादच्या नागरिकांनी खासदार झालो तेंव्हा  आणि आज अशी दोन ईद साजरी केली, पाहिल्यांदा रमजान च्या पवित्र महिण्यात दोन वेळा ईद साजरी केली अशी प्रतिक्रिया दिली