गंगापूर येथे सर्व धर्मीयांसाठी ईद मिलन कार्यक्रम उत्साहात

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर शहरातील माजी नगरसेवक नईम -उल -मन्सुरी यांच्या निवासस्थानी ईद फित्र च्या पावन निमित्ताने भव्य ईद मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हिंदू - मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर ईदच्या आनंदात सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश दिला. यावेळी भाईजान अर्थात परस्पर प्रेम, सौहार्द आणि एकतेचा संदेश उपस्थितांना देण्यात आला. 

या प्रसंगी नायब तहसीलदार सचिन वाघमारे, पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड, होमगार्डचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, गटनेते संतोष अंबिलवादे, नगरसेवक फैसल चाऊस, सोपान देशमुख, सुनिल घाडगे, मुनाफ कुरेशी, अनिस कुरेशी, डॉ आबासाहेब शिरसाट, विश्वजीत चव्हाण, सुनील घाडगे, मुकुंद जोशी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे, विठ्ठल झांजुर्णे, गोपनी शाखाचे मनोज नवले, भागवत खाडे, गंगापूर तलाठी गणेश लोणे, तुकाराम सटले, यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पारंपरिक सुशखुर्माचा आस्वाद घेत सर्वांनी आनंद साजरा केला. या ईद मिलन कार्यक्रमामुळे समाजात एकात्मता आणि बंधुत्वाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.