विवाहितेच्या छळप्रकरणी आठ आरोपींची निर्दोष मुक्तता

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) हुंड्यासाठी छळ, मारहाण करून उपाशी ठेवणे तसेच घराबाहेर काढल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील ढालसावंगी येथील सासरच्या आठ जणांची सिल्लोड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. टी. अढायके यांनी सबळ पुराव्याअभावी गुरुवारी निर्दोष मुक्तता केली. 

या प्रकरणातील पती :- शेख अय्युब, शेख मुश्ताक (सासरा), शेख शाहीन (सासू), शेख हिनाबी (मोठी नणंद), शेख मुख्तार (दिर), शेख सलीम इसा (मामे सासरा), शेख गौसिया (मामे सासू) आणि शेख फातिमाबी (नणंद) (रा. ढालसावंगी, जि. बुलढाणा) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

फिर्यादी फिरदौसबी शेख अय्युब (माहेर रा. अजिंठा) यांनी ३० मार्च २०२३ रोजी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, त्यांचा विवाह २४ मार्च २०१९ रोजी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सासरी चांगली वागणूक मिळाली. 

मात्र, दोन अपत्ये झाल्यानंतर सेंट्रिंगचे साहित्य खरेदी करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण न केल्याने उपाशी ठेवणे, मारहाण करणे व घरातून हाकलून देणे असा छळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.