कला आणि नाटकानेच जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला ज्येष्ठ अभिनेत्री अभिनेत्री रत्ना पाठक यांचे प्रतिपादन

Foto
नाट्य सहवास २०२६०
मिलिंत जफाई उमृती पुरस्कार विवरण
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): कला आणि नाटक हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून त्यांनी मला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. नाटकाने मला घडविले आणि या कलेच्या प्रवासातून अनेक माणसे, गुरू, तंत्रज्ञ तसेच आयुष्यभराच्या अनुभवाची शिदोरी मिळाली. आज मला जे काही मिळाले आहे, त्यामागे कलेचा आणि नाटकाचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी यावेळी केले.
-
जिगीषाच्या चाळीसाव्या वर्धापनदिनापासून सुरू झालेल्या नाट्यमहोत्सवाचा उद्घाटन समारंभरुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर येथे करण्यात आला. महात्मा गांधी मिशन आणि 'मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाऊंडेशन' यांच्या सहकार्याने हा नाट्यसहवास आयोजित करण्यात आला असून यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी उपस्थितांशी संवाद साधला. जिगीषा, महात्मा गांधी मिशन आणि
मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा यंदाचा मिलिंद सफई स्मृती पुरस्कार नाट्यकर्मी योगेश शिरसाट या दिग्दर्शक-अभिनेत्याला मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रुक्मिणी सभागृहात प्रदान करण्यात आला.
यावेळी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, फाउंडेशनचे विश्वस्त नंदकिशोर कागलीवाल, कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, लेखक बाबा भांड, सचिन मुळे, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, नीलेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले. अभिनेते योगेश शिरसाट यांना प्रदान करण्यात आलेल्या मिलिंद सफई स्मृती पुरस्कार पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, शाल आणि ११ हजार रोख रक्कम असे आहे. प्रास्ताविक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. तर आभार नीलेश राऊत यांनी मानले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions