जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मूक मोर्चा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जळगाव
जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद आता शहरात उमटले आहेत. अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मंगळवारी (दि.१) महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेपासून ते
जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी १८ ऑगस्टपासून ग्रामसभा कामकाजावर टाकलेला बहिष्कार कायम ठेवला आहे. स्व. पाटील यांच्या असणाऱ्या समाजकंटकांवर खुनाचा गुन्हा दाखल करून मृत्यूस कारणीभूत खटला जलदगती न्यायालयात
चालवावा. वारंवार होणाऱ्या १० ते १२ ग्रामसभांऐवजी वर्षातून केवळ एकच आर्थिक नियोजन व आढावा ग्रामसभा ठेवण्यासाठी अधिनियमात सुधारणा करावी. ग्रामसभेत त्रयस्थ व्यक्तीकडून सोशल मीडियासाठी केल्या जाणाऱ्या अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरणावर कायदेशीर बंदी घालावी यासह आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














