छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरातील प्रमुख चार सर्व्हिस रस्त्याच्या रोडच्या विकासासाठी ५५० कोटी रुपये, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी ४३ कोटी रुपये आणि सौरऊर्जा प्रकल्पासाठी गंगापूर येथील शेतकी महामंडळाची १५० एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महापालिका पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. २४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुंबईतील
सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये आणि सभागृहनेते गोविंद केंद्रे यांनी शहराच्या महत्त्वाकांक्षी विकासकामांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. यावर प्रत्येक कामाचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती महापौर
राजूरकर यांनी दिली.
बीड बायपासच्या दोन्ही बाजूंनी, जिजाऊ चौक ते एपीआय कॉर्नर, जळगाव रोडच्या एका बाजूने आणि पैठण रोडवर दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड प्रस्तावित आहेत. रस्त्यांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने अतिक्रमण काढून रस्ते रुंद केले. आता बांधकामासाठी ५५० कोटींची गरज असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी
पदाधिकारी आले एकत्र !
रस्त्यांच्या निधीसाठी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी यापूर्वी मंत्री अतुल सावे यांच्यासोबत, तर महापौर समीर राजूरकर यांनी पाणीपुरवठा योजनेच्या आढाव्यासाठी स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सोमवारी प्रथमच महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि सभागृहनेते एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले.
काही निधी जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार असून, उर्वरित ४३ कोटी राज्य शासनाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेचा व पथदिव्यांचा वीजखर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी गंगापूर येथील शेतकी महामंडळाची १५० एकर जागा देण्याची मागणी करण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













